बुधगाव येथे डंपरने वृध्देला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:40 IST2020-10-19T12:39:13+5:302020-10-19T12:40:36+5:30
accident, sangli, मिरज तालुक्यातील बुधगाव येथील शिवाजीनगर येथे रस्त्याकडेला बसलेल्या महिलेला डंपरने चिरडल्याची घटना शनिवारी घडली. लक्ष्मीबाई बाबुराव जाधव (वय ७५) असे मृत वृध्देचे नाव असून सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.

बुधगाव येथे डंपरने वृध्देला चिरडले
सांगली : मिरज तालुक्यातील बुधगाव येथील शिवाजीनगर येथे रस्त्याकडेला बसलेल्या महिलेला डंपरने चिरडल्याची घटना शनिवारी घडली. लक्ष्मीबाई बाबुराव जाधव (वय ७५) असे मृत वृध्देचे नाव असून सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधगाव येथील शिवाजीनगर येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून या कामावर खडी टाकण्यासाठी डंपर आला होता. यावेळी मृत् जाधव या रस्त्याकडेला बसल्या होत्या. खडी टाकून डंपर चालक परत जात असताना त्यास रस्त्याकडेला बसलेल्या जाधव दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या अंगावरुन डंपर गेल्याने त्या जागीच मृत झाल्या.
जाधव यांना तपासणीसाठी ग्रामस्थांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.