शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्या 'एका' मुद्याला पाठिंबा, कोणता मुद्दा...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:12 IST

सांगलीत ११ ऑगस्टला ओबीसी बांधवांचा एल्गार मेळावा

सांगली : राज्यातील आमदारांनी ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी पक्ष, पार्टीचा विचार न करता पाठीमागे उभे रहावे. जे आमदार आमच्यामागे उघडपणे येणार नाहीत. त्यांच्याबाबत येत्या विधानसभा निवडणुकीत समाजाने क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला. तर मनोज जरांगे- पाटील यांच्या आमदार पाडण्याच्या मुद्याला माझा पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले.सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर ११ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचा एल्गार महामेळावा होत आहे. त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रा. हाके सांगलीत आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याच्या समवेत मेळाव्याच्या निमंत्रक माजी महापौर संगीता खोत, संजय विभूते, माजी नगरसेवक विष्णू माने, संग्राम माने, प्रशांत लेंगरे, सुनीता मदने, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार, प्रदीप वाले, विठ्ठल खोत, सुनील गुरव, सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक ठिकाणी गेल्या ४-५ वर्षापासून घेतलेल्या नाहीत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता निवडणुकांची मागणी आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचा वादावर न्यायालयाने तीन वर्षात एकही सुनावणी घेतलेली नाही. ही बाब चिंताजनक आणि लोकशाहीला मारक आहे.आरक्षणाचा निर्णय लवकर घेऊन तातडीने निवडणुका व्हाव्यात. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आमदार पाडण्याच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. ओबीसी समाजालाही पाठिंबा न देणाऱ्या आमदारांबाबत क्रांतिकारक निर्णय घेऊ शकते, असे झाले तर सर्व ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल.

प्रकाश आंबेडकर आमच्या मताशी सहमतकाही मागण्यांबाबत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरही आमच्या मताशी सहमत आहेत. आता मागण्यांसाठी रस्त्यावरील लढाई केल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षणप्रश्नी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र बसावे. यामध्ये संपूर्ण राज्यातील सामाजिक परिस्थितीची जाण असलेले नेते शरद पवार हेच आरक्षणाचा प्रश्न सोडवतील, आता त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही हाक्के म्हणाले.

जातीच्या वर्गीकरणास विरोधप्रा. हाक्के म्हणाले, जातीच्या वर्गीकरण आणि क्रिमिलेएरचा निर्णय अमान्य आहे. सामाजिक न्यायावर आरक्षण लागू केल्यामुळे आर्थिक निकषावर वर्गीकरण करणे हे घटनाबाह्य आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रश्न सुटण्यापेक्षा तो अधिक समस्या निर्माण करणारा ठरणार आहे. तसेच आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेचा आहे.

आमदारांनी पाठिंबा द्यावाहाक्के म्हणाले, सांगली जिल्ह्यातील आठ आमदार, खासदारांनी ओबीसी समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, अन्यथा यापुढे आम्हाला गृहीत धरु नये. साखर कारखानदार, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, संचालक यांनीही भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.

मेळाव्यासाठी हे राहणार उपस्थितमेळाव्यासाठी ओबीसी समाजाचे नेते व मंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, आण्णासाहेब डांगे, शब्बीरभाई अन्सारी, नवनाथ वाघमारे, ॲड. मंगेश ससाणे आदी उपस्थित राहतील.

टॅग्स :Sangliसांगलीreservationआरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील