पहिला डोस घेतलेल्यांची संख्या साडेनऊ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:52+5:302021-08-17T04:32:52+5:30

सांगली : कोरोनाचा दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात मात्र पहिल्या डोसधारकांचीच संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. ...

The number of those who took the first dose is over nine and a half lakhs | पहिला डोस घेतलेल्यांची संख्या साडेनऊ लाखांवर

पहिला डोस घेतलेल्यांची संख्या साडेनऊ लाखांवर

सांगली : कोरोनाचा दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात मात्र पहिल्या डोसधारकांचीच संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी १ लाख ५ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले, त्यातून पहिला डोस खूपच मोठ्या संख्येने देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टरोजी लसीकरण सुरू ठेवण्यात आले होते. यादिवशी ७ हजार ८९० जणांनी पहिला, तर फक्त १ हजार ५०९ जणांनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ९ लाख ६३ हजार ११५, तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ४ लाख ३१ हजार ४८५ इतकी झाली आहे. पहिला डोस घेतलेल्या बहुतांश लाभार्थ्यांचे दुसरे लसीकरणही आता पूर्ण होत आले आहे, त्यामुळेच पहिल्या डोसधारकांची संख्या वाढत आहे. आजवर एकूण लसीकरण १३ लाख ९४ हजार ६३८ इतके झाले आहे.

Web Title: The number of those who took the first dose is over nine and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.