वीसपेक्षा कमी पटसंख्या, सांगली जिल्ह्यातील 'इतक्या' शाळांवर गंडांतर येणार

By अशोक डोंबाळे | Published: October 1, 2022 04:43 PM2022-10-01T16:43:44+5:302022-10-01T16:45:29+5:30

पण, शिक्षण विभागाला अद्याप तसे आदेश आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Number less than twenty, 385 schools in Sangli district will be closed | वीसपेक्षा कमी पटसंख्या, सांगली जिल्ह्यातील 'इतक्या' शाळांवर गंडांतर येणार

संग्रहित फोटो

Next

सांगली : जिल्हा परिषदेच्या १,६८७ पैकी ३८५ प्राथमिक शाळा २० पटसंख्येच्या असून, त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथील दोन शिक्षकांवरील खर्च टाळून २० पटाखालील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत पोहोचविण्यावर खर्च करणे योग्य होईल, यामुळे वेतनखर्चात कपात होईल, अशा पर्यायाची चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यात २० पटाखालील सर्व शाळा द्विशिक्षकी आहेत. प्राथमिक शिक्षण प्रशासनाने केलेल्या पाहणीमध्ये जिल्ह्यात अशा ३८५ शाळा आहेत. शिराळा तालुक्यात एका पटाची शाळा, तर कडेगाव तालुक्यात दोन पटाची शाळा आहे. तीन विद्यार्थी असलेल्या जत आणि आटपाडी तालुक्यात दोन आणि चार विद्यार्थी असलेल्या आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्यात प्रत्येकी एक शाळा आहे. त्यामध्ये दोन दोन शिक्षक कार्यरत आहेत. काही कारणांमुळे एखादा दिवस एकही विद्यार्थी शाळेला आला नाही तरी शिक्षक मात्र उपस्थित असतात. विद्यार्थीच नसल्यामुळे त्यांना विनाअध्यापन जावे लागते. या शाळांवर आता शासनाने लक्ष ठेवले आहे. दहा आणि वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचे धोरण आहे. पण, शिक्षण विभागाला अद्याप तसे आदेश आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

८४ शाळांत दहापेक्षा कमी विद्यार्थी

जिल्ह्यातील तब्बल ८४ शाळांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी आहेत. एक ते चार विद्यार्थी असलेल्या आठ, पाच ते सात विद्यार्थी असलेल्या ३५, आठ विद्यार्थी असलेल्या १५, नऊ विद्यार्थ्यांच्या १५, दहा पटाच्या ११, अकरा पटाच्या ३२, बारा पटाच्या २७, तेरा पटाच्या २९, चौदा पटाच्या २९, तर १५ ते २० पटांच्या १८४ शाळा आहेत.

वीस पटाखालील शाळांसंबंधी राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. -जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

एक ते २० पटाच्या शाळा
तालुका - शाळा
आटपाडी - ६७
जत - ९२
क. महांकाळ - २७
खानापूर - ३२
मिरज - ६
पलूस - १३
शिराळा - ५७
तासगाव - २८
वाळवा - ४१
कडेगाव - २२
एकूण - ३८५

Web Title: Number less than twenty, 385 schools in Sangli district will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.