शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आता गडकरी राष्ट्रवादीत जातील, असे म्हणू नका..; जयंत पाटील यांनी घेतली फिरकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:15 IST

इस्लामपूर : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा समृद्ध आणि संपन्न विकास होत नाही, तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही. त्यासाठी ...

इस्लामपूर : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा समृद्ध आणि संपन्न विकास होत नाही, तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही. त्यासाठी दळणवळण, ऊर्जा, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत व्यवस्था बळकट असायला हव्यात. त्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संपन्न आणि समृद्ध देश बनवण्यासाठी आरआयटीसारख्या संस्थांनी योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.राजारामनगर येथे कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयाने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी वसतीगृह आणि अत्याधुनिक व्यायाम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, अरुण लाड, रोहित पाटील, सुहास बाबर, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, भगतसिंह पाटील, प्रतिक पाटील, दिलीपराव पाटील, प्रा. शामराव पाटील, प्रा. आर. डी. सावंत, मनोज शिंदे, आदित्य पाटील, राजवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. पाच ट्रिलियन डॉलरची जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवायची आहे. तसेच, तरुणांचा देश म्हणून भारताला जगात अग्रस्थानी ठेवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. ज्ञानाच्या जोरावर भारत जगावर राज्य करू शकतो. याची प्रचिती येत आहे.ते म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, कृषी, सहकार क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या परिसराचा विकास झाला. जगात सुखाने जगण्याच्या निर्देशांकावर चर्चा सुरू आहे. अशावेळी सर्व क्षेत्रांतील पायाभूत विकास भक्कम करण्यावर भर द्यायला हवा. शहरातील वाढते नागरीकरण रोखण्यासाठी गाव-खेड्यांचा विकास करणे गरजेचे आहे.

आता गडकरी राष्ट्रवादीत जातील, असे म्हणू नका..नितीन गडकरी यांच्या दौऱ्यावरून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा झडत होत्या. आजच्या कार्यक्रमानंतर गडकरी राष्ट्रवादीत जातील अशी बातमी कराल, असे म्हणत जयंत पाटील यांनी पत्रकारांची भाषणात फिरकी घेतली. त्यावर गडकरी भाषणात म्हणाले, “जयंतराव राजकारणाचा फार विचार करायचा नाही, राजकारणातून समाजाच्या प्रगतीचे, हिताचे काम करत राहा,” असा सल्ला त्यांनी दिला. त्यावर सभा मंडपात हशा पिकला.स्वायत्तता मिळाल्याने प्रगती : जयंत पाटीलआरआयटी ही देशातील पहिल्या शंभरमधील एक महाविद्यालय आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतर प्रगती साधली आहे. संशोधन, उत्पादन निर्मितीवर भर देत प्रथितयश संस्था म्हणून नावलौकिक कमावला आहे. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. आर. डी. सावंत यांनी आभार मानले.

पेठ-सांगली रस्ता लवकरच पूर्ण..गेल्या अनेक वर्षांपासून पेठ-सांगली रस्ता रखडला होता. त्याचा उल्लेख करत गडकरी यांनी त्यासाठी मलाही बोल खावे लागत होते. मात्र, आता येत्या दोन महिन्यांत हा रस्ता अत्यंत दर्जेदारपणाने पूर्ण होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरNitin Gadkariनितीन गडकरीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस