शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

सांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:59 PM

सांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. सलग सुटीनंतर सोमवारी हे कर्मचारी व अधिकारी सकाळी कार्यालयात गैरहजर होते.

ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचाऱ्यांना नोटिसाआयुक्तांची कारवाई : शिस्तभंग, पगार कपातीचा इशारा

सांगली : महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आयुक्तरवींद्र खेबूडकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. सलग सुटीनंतर सोमवारी हे कर्मचारी व अधिकारी सकाळी कार्यालयात गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात आणि शिस्तभंगाच्या कारवाईबद्दल नोटिसा देण्याचे आदेशही आयुक्तांनी कामगार अधिकाऱ्यांना दिले.महापालिकेचे कार्यालय शनिवार, रविवार सुटीनिमित्त बंद होते. सोमवारी सकाळी सर्व कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन वेळेत आवश्यक होते; पण सांगलीतील मुख्यालयासह शाळा नंबर एकजवळील प्रमुख कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य होती.

नागरिक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे हे सकाळी दहा वाजता महापालिकेत कामानिमित्त आले होते. तेव्हा त्यांना कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी थेट आयुक्त खेबूडकर यांना दूरध्वनी करून कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीची कल्पना दिली. बर्वे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तातडीने सर्वच विभागांकडून हजेरीपत्रक मागविले.यात उपायुक्त, नगररचना, मुख्यालय, आस्थापना, प्रभाग समित्या, बांधकाम, आरोग्य, महिला बालकल्याण, स्थायी समिती आणि नगरसचिव कार्यालयांमध्ये शाखा अभियंता, आरेखक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, आरोग्य निरीक्षकांसह तब्बल ८४ कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले.

या लेटलतिफ कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांना दिले. त्यानुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात आणि गैरहजेरीबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. आडके यांनी त्यासंदर्भात संबंधितांना नोटिसा बजावल्या.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीcommissionerआयुक्त