विजयसिंहराजे, रोहिणी पटवर्धनांना स्वित्झर्लंडच्या कर विभागाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:46 AM2019-11-26T04:46:51+5:302019-11-26T04:47:16+5:30

स्वीस बॅँकेत असलेल्या खात्याबद्दल सांगलीचे विजयसिंहराजे पटवर्धन व त्यांच्या पत्नी रोहिणी पटवर्धन यांना स्वित्झर्लंडच्या कर विभागाने नोटीस बजावल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

Notice of Tax Department of Switzerland to Vijayasinharaje & Rohini Patwardhan | विजयसिंहराजे, रोहिणी पटवर्धनांना स्वित्झर्लंडच्या कर विभागाची नोटीस

विजयसिंहराजे, रोहिणी पटवर्धनांना स्वित्झर्लंडच्या कर विभागाची नोटीस

Next

सांगली : स्वीस बॅँकेत असलेल्या खात्याबद्दल सांगलीचे विजयसिंहराजे पटवर्धन व त्यांच्या पत्नी रोहिणी पटवर्धन यांना स्वित्झर्लंडच्याकर विभागाने नोटीस बजावल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पटवर्धन परिवाराकडून अद्याप याबाबत कोणताही खुलासा प्राप्त झालेला नाही. विजयसिंहराजे हे तत्कालीन सांगली संस्थानचे ते वारसदार आहेत.
स्वित्झर्लंडच्याकर विभागाने १९ नोव्हेंबरला एका विभागीय राजपत्रात ही नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी विजयसिंहराजे व रोहिणी पटवर्धन संचालक असलेल्या एका कंपनीच्या स्वीस बॅँकेतील खात्याबद्दल विचारणा केली आहे.

Web Title: Notice of Tax Department of Switzerland to Vijayasinharaje & Rohini Patwardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.