शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

Sangli Crime: शहरातच नव्हे ग्रामीण भागातही नशेखोरांचे अड्डे, पोलिसांचा अंकुश राहिला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:34 IST

गांजा, औषधी गोळ्या, इंजेक्शनची सर्वत्र नशा

घनशाम नवाथे

सांगली : पडक्या इमारती, मोकळी मैदाने आणि दुर्लक्षित ठिकाणी जागोजागी दारूच्या बाटल्या, ग्लास पडलेले दिसतात. याच कचऱ्यातून गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोनची पाकिटे, इंजेक्शनच्या सिरिंज, नशेच्या गोळ्याची पाकिटे डोकावताना दिसतात. केवळ शहरातच नव्हे ग्रामीण भागातही नशेखोरांचे अड्डे निर्माण झाले आहेत. हे अड्डे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी पोलिस प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत. त्यामुळे नशेबाजांची आणि त्यांच्या अड्ड्यांची संख्या वाढतच आहे.जर नशेचे पदार्थ सहजपणे उपलब्ध होत असतील तर त्याकडे अनेकजण आकर्षित होतात. गांजा, नशेच्या गोळ्या, इंजेक्शन सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागातील अड्ड्यांवर सकाळपासून नशेबाज नशेत तर्रर्र होऊन पडतात. नशेबाजांच्या अड्ड्यावर जाऊन त्यांना विचारण्याचे कोणी धाडस करत नाही. कारण नशेबाज थेट अंगावर धावून येतात. पडक्या इमारती, मोकळी मैदाने, झाडेझुडपे, नदीकाठचा परिसर, बंद पडलेल्या शाळा, स्मशानभूमीचा परिसर आदी ठिकाणी वर्दळ कमी असल्यामुळे नशेखोरांनी येथे अड्डे बनवले आहेत.पोलिसांकडून सर्व ठिकाणी गस्त घातली जात नाही. त्यामुळे नशेबाज बिनधास्तपणे नशा करताना दिसून येतात. गांजा ओढणाऱ्यांवर पोलिसांकडून सांगली, मिरजेत अधून-मधून कारवाई केली जाते. परंतु, हे प्रमाण नगण्य आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक नशेखोरांचे अड्डे निर्माण झाले आहेत. पोलिस कारवाईत सातत्य नसल्यामुळे अनेकांचे फावले आहे. त्यामुळे नशेखोरांच्या अड्ड्यांवर बाटल्यांचा खच वाढतच चालला आहे. त्यासोबत गांजा ओढण्यासाठीचे फिल्टर पाईप, कोन, इंजेक्शन सिरिंज यांची संख्याही वाढतच चालली आहे.

विट्यात अनेक ठिकाणी ‘दम मारो दम’विट्यातील नगरपालिकेच्या बंद पडलेल्या जलतरण तलावात दारूच्या बाटल्या, रिकामे ग्लास यांचा अक्षरश: खच पडलेला दिसून येतो. याचठिकाणी इंजेक्शनच्या सिरिंज कशा येऊन पडल्या आहेत, याचा आता पोलिसांनीच शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फिल्टर पाईप, कोनचे बॉक्सही पडले आहेत. तसेच मार्केट यार्ड परिसरातील स्मशानभूमी, खानापूर रस्ता परिसरातील स्मशानभूमी आदी अनेक ठिकाणी नशेबाजांनी अड्डे बनवले आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. त्यामुळे सर्वत्र नशेबाजांनी केलेला कचरा वाढतच चालला आहे.

सांगली, मिरजेत ठिकाणेसांगलीत शामरावनगर परिसरातील काटेरी झुडपे, नदीकाठचा परिसर, शहराजवळील शेती, मोकळी क्रीडांगणे, पडक्या इमारती येथे नशेबाजांचे जागोजागी अड्डे आहेत. मिरजेतून गांजाची सर्वत्र तस्करी होत असल्यामुळे येथेही जागोजागी अड्डे निर्माण झाले आहेत. तर पोलिसांची कारवाई मात्र बोटावर माेजण्याइतपतच दिसून होते. सांगली, मिरज, विटासह जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हेच चित्र दिसून येते.

ड्रग्ज ‘पेडलर’वर कारवाई हवीवेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज विकणारे अनेक ‘पेडलर’ मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यांच्यावर थेट कारवाई करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याची गरज आहे. सातत्याने त्यांच्यावर कारवाई केली तर आळा बसू शकेल. ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई झाली तर सहजपणे कोणाला उपलब्ध होणार नाही. परिणामी ड्रग्जची नशा करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल.

कारागृहात गांजा पुरवण्याचे धाडसगांजा विक्रेत्यांवर पोलिस दलाचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे अधून-मधून जेलमध्ये आरोपींना गांजा पुरवण्याचे धाडस अनेकजण करतात. जर जेलमध्ये गांजा पुरवण्यासाठी धाडस करत असतील तर इतर ठिकाणी ते राजरोसपणे गांजा विक्री करत असतील यात शंकाच नाही.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस