माझा नवरा मेलाय की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:46 IST2017-11-12T23:46:16+5:302017-11-12T23:46:59+5:30

माझा नवरा मेलाय की नाही?
सांगली : ‘साहेब माझा नवरा मेलाय की नाही? अजून आम्हाला मृतदेह ताब्यात दिलेला नाही’, असा जाब मृत अनिकेत कोथळे याची पत्नी संध्या हिने गळ्यातील मंगळसूत्र दाखवत रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विचारला. तिच्या या प्रश्नाने यावेळी उपस्थित साºयांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. उपस्थितांची मने हेलावून गेली.
पोलिस कोठडीत खून केलेल्या अनिकेत कोथळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी केसरकर सांगलीत आले होते. केसरकर यांना पाहून संध्याने गळ्यातील मंगळसूत्र हातात पकडून ‘साहेब माझा नवरा मेलाय की नाही, अजून आम्हाला त्याचा मृतदेह ताब्यात दिला नाही, हे असं का? असा प्रश्न विचारला. तिच्या या प्रश्नाने पोलिस अधिकाºयांनाही शरमेने मान खाली घालावी लागली. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण केसरकर यांच्याकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते. संध्याजवळ तिची चिमुरडी प्रांजल होती. केसरकर यांनी तिच्या पाठीवरुन मायेने हात फिरविला.