अबब! कांदा नव्हे; हा तर पाऊण किलोचा कांदोबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 08:02 IST2023-02-27T08:01:46+5:302023-02-27T08:02:26+5:30

लावणीसाठी बाजारपेठेतून नेहमीचे कांद्याचे तरू (रोपे) आणले होते.

Not an onion; This is half a kilo of kandoba! | अबब! कांदा नव्हे; हा तर पाऊण किलोचा कांदोबा!

अबब! कांदा नव्हे; हा तर पाऊण किलोचा कांदोबा!

सांगली : ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतात थोडा थोडका नव्हे, तर चक्क पाऊण किलो वजनाचा कांदा पिकलाय. त्याला पाहायला आणि हनुमंतरावांचे कौतुक करायला अवघा गाव लोटला आहे. तुम्ही आतापर्यंत जास्तीत जास्त ५०-१०० ग्रॅम वजनाचा कांदा पाहिला असेल; पण या कांद्याने सारेच विक्रम तोडले आहेत.

हनुमंतरावांनी उसात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. त्यामुळे उसासोबतच कांद्यालाही मुबलक खतपाणी मिळत गेले. सुरुवातीला १०-१२ मोठे कांदे निघाले. नंतर मात्र सरसकट कांदे, असेच वजनदार निघू लागले. गेली. वजन केले असता प्रत्येक कांदा सरासरी चक्क ७५० ते ८०० ग्रॅमपर्यंत वजनदार भरला. कांद्याचा फड पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली.

 लावणीसाठी बाजारपेठेतून नेहमीचे कांद्याचे तरू (रोपे) आणले होते. उसासोबतच दोनवेळा आळवणी केली. ह्युमिक, फुलविक, सिव्हिडची दोनवेळा फवारणी केली. उसासाठी केलेला हा प्रयोग कांद्यासाठीही लागू पडला. कांद्याच्या या दणदणीत उत्पादनाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी शिरगावे यांचा सत्कार केला.

Web Title: Not an onion; This is half a kilo of kandoba!

टॅग्स :onionकांदा