शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आई-बाबा तर नाहीत..मॅडम तुम्हीच सांगा माझा वाढदिवस कधी?; शिक्षिकेने शोधली तारीख अन् शाळेतच कापला केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 11:51 IST

चिमुकल्याचा चेहरा फुलला

प्रदीप पोतदारकवठेएकंद (सांगली) : मुलांचं भावविश्व आई-वडिलांच्या प्रेमानं फुलत असतं...पण, आयुष्य फुलण्याआधीच मातृ-पितृछत्र हरपले तर प्रेमाची एक मोठी पोकळी त्यांच्या विश्वात तयार होते. अस्वस्थ मनाला अनेक प्रश्न सतावतात. कवठेएकंद येथील शाळेतील अशाच एका मुलाने अन्य मुलांचे वाढदिवस साजरे होताना सवाल केला, मॅडम, माझा वाढदिवस कधी असतो? काळजात कालवाकालव झाली खरी, पण शिक्षिकेने मायेचे पंख पसरत त्या मुलाला वाढदिवसाची तारीख मिळवून देत शाळेतच मोठ्याने वाढदिवस साजरा केला.रिहान करण घाडगे या पहिलीतील मुलाची कहाणी वेदनादायी आहे. गरिबीच्या चटक्यांनी त्रस्त झालेल्या कुटुंबातील त्याचा जन्मापासूनचा प्रवास खडतरच राहिला. दीड वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचे आकस्मिक निधन झाले. आजीने त्याचा सांभाळ केला. कोमजलेले त्याचे आयुष्य शाळेत पुन्हा फुलायला लागले तरीही सभोवतालच्या मुलांचे आयुष्य पाहुन त्याच्या भाबड्या मनात प्रश्नांनी घर केले. इतरांचे वाढदिवस पाहून तो मॅडमना वारंवार विचारायचा, मॅडम, माझा वाढदिवस कधी?विद्यार्थ्यांशी लळा असणाऱ्या वर्गशिक्षिका नूतन परीट यांनी त्याचा वाढदिवस साजरा करायच ठरवलं. अंगणवाडीत जाऊन त्याची जन्मतारीख शोधली व ६ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा केला. मुख्याध्यापकांनी रिहानला कपडे आणले. येथील कापड व्यावसायिक पाटील यांनीही गिफ्ट म्हणून आणखी एक ड्रेस दिला. कवठेएकंद जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये शिकणाऱ्या रिहानचा वाढदिवस ६ नोव्हेंबरला सोमवारी थाटात साजरा करण्यात आला.शाळेत केक कापून रिहानला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले. या आपुलकीच्या वाढदिवसाला संतोष आठविले, जावेद जमादार, तानाजी शिरतोडे, मुख्याध्यापक राजेंद्र सागरे, उपशिक्षक विशाल खाडे तसेच कापड व्यावसायिक पूनम पाटील उपस्थित होते.

चिमुकल्याचा चेहरा फुललावाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न सत्यात उतरताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याला गवसले अन् त्याच्या आनंदाने शिक्षकांसह शाळेचे प्रांगणही आनंदाने फुलून गेले.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाTeacherशिक्षक