शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

संविधान कोणीही बदलू शकणार नाही - अमित शाह; सांगली, शिराळा, कऱ्हाडमध्ये प्रचार सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:16 IST

'महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला'

सांगली : आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील. कोणीही माईचा लाल आला, तरी संविधान बदलणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांच्या सांगली, शिराळा, कऱ्हाड येथे सभा झाल्या.सांगली येथील सभेत शाह म्हणाले, संविधान हा प्रचाराचा मुद्दा नसून विश्वासाचा आहे. विरोधक संविधानाच्या नावावर मते मागतात, कारस्थाने रचतात. महाराष्ट्रातील एका सभेत संविधानाच्या कोऱ्याच प्रती वाटल्या. राहुल गांधी यांनी संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. संविधानाला हातात घेऊन संसदेत शपथ घेतली, ते तरी असली होते की नकली? हे त्यांनी देशाला सांगावे. नकली संविधान दाखविणाऱ्यांवर भरवसा कसा करायचा? नुकतेच ते इंग्लंडला गेले होते, तेव्हा देशाला आरक्षणाची गरज नसल्याचे म्हणाले. पण संविधानाला हात लावण्याची कोणाचीच हिम्मत नाही. आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील.

शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला देण्याचा डावशिराळा: वोट बँका जपण्यासाठी वक्फ बोर्डाला पाठबळ देण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. आघाडीचे सरकार चुकून जरी राज्यात आले, तर शेतकऱ्यांच्या जमिनी या बोर्डाला देण्याचे काम ते करतील, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथे केली.

चार पिढ्या आल्या, तरी कलम पुन्हा लागू हाेणार नाहीजम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर काँग्रेस व आघाडीतील नेत्यांचा विरोध झाला. हे कलम पुन्हा आणण्याचा त्यांचा विचार आहे. शरद पवारही त्यामध्ये आहेत. पण, शरद पवारांच्या अजून चार पिढ्या जरी आल्या, तरी आम्ही हे कलम पुन्हा लागू देणार नाही, असे शाह म्हणाले.

महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला !कऱ्हाड : ‘माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर नेहमी अन्याय केला असून ते या वयातही खोटे बोलतात,’ अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कऱ्हाड येथे केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेतशाह म्हणाले की, मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणायचे आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असल्याने राज्यातही युतीचे सरकार आले तर महाराष्ट्र देशातील क्रमांक एक राज्य बनेल. यासाठी महायुतीला व देवेंद्र यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शाह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. स्थानिक उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना त्यांनी राज्यासाठी फडणवीस यांना साथ देण्याचे आवाहन केल्यामुळे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत शाह यांनी दिल्याचा अंदाज बांधला जात आहे.

समर्थ रामदास यांचा शिवरायांना पाठिंबाअमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या शिराळ्याच्या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले. त्या समर्थ रामदास यांना मी नमन करतो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीshirala-acशिराळाkarad-north-acकराड उत्तरAmit Shahअमित शाहMahayutiमहायुती