शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर सहा तास मिळाली नाही मदत; कारमध्ये रक्ताचं थारोळं, सहा जणांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:28 IST

तासगावजवळ मंगळवारी मध्यरात्री चालक आजोबांचा ताबा सुटून कार कालव्यात काेसळली

लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव: काेकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीचा वाढदिवस साजरा करून दाेन मुली- नातवंडांना घेऊन तासगावला परतत असताना अपघातात आजी- आजाेबांसह ६ जणांचा मृत्यू झाला. एकाच अपघाताने तीन कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तासगाव-मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत मंगळवारी मध्यरात्री चालक असलेल्या आजोबांचा ताबा सुटून कार कालव्यात काेसळली. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.

अपघातात राजेंद्र पाटील (५६), सुजाता राजेंद्र पाटील (५२, दाेघेही रा. तासगाव), त्यांची मुलगी प्रियांका खराडे (३३), नात दूर्वा खराडे (५), कार्तिकी खराडे (१, सर्व मूळ रा. बुधगाव, ता. मिरज, सध्या रा. पुणे) आणि राजवी भोसले (३, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले (३०, रा. कोकळे) ही गंभीर जखमी झाली आहे.

तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे मंगळवारी कुटुंबीयांसमवेत कारमधून कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे आपली लहान मुलगी स्वप्नालीच्या घरी, नात राजवीच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी सुजाता, पुण्याहून सुटीसाठी आलेली मोठी मुलगी प्रियांका आणि तिच्या दोन मुली दूर्वा आणि कार्तिकी हाेत्या. तेथून रात्री उशिरा परतताना हा अपघात झाला. 

कारमध्ये अक्षरश: रक्ताचा थारोळा

अपघात मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास झाला. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. तात्काळ तासगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये स्वप्नाली भोसले जखमी अवस्थेत आढळल्या. रात्रीची वेळ व फारशी वर्दळ नसल्याने अपघातानंतर सहा तासांपर्यंत अपघातग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. वेळेत मदत मिळाली असती, तर काही जीव वाचवता आले असते.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू