शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

कोठून आलात; थांबा जरा कारण! सांगलीतील गृहनिर्माण सोसायट्यांत बाहेरच्यांना नो एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 13:36 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, शहरातील गृहनिर्माण सोसायट्याही आपापल्यापरीने कोरोनाला थोपविण्यासाठी ...

ठळक मुद्देभाजीपाला, दूध खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात आहे.

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, शहरातील गृहनिर्माण सोसायट्याही आपापल्यापरीने कोरोनाला थोपविण्यासाठी कार्यरत आहेत. सभासदांत जनजागृतीपासून निर्जंतुकीकरणापर्यंत सर्व खबरदारी सोसायट्यांनी घेतली आहे. जणू काही या सोसायट्यांनी स्वत:च क्वारंटाईन होऊन कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही, असा निश्चय केला आहे.

महापालिका क्षेत्रात अगदी दहा फ्लॅटपासून ते दोनशे फ्लॅट रो बंगल्यापर्यंतच्या सोसायट्या आहेत. कोरोनाला दाराबाहेरच ठेवण्यासाठी या सोसायट्यांतील सभासद, पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शासकीय आदेशाचे पालन करीत सोसायट्यांमध्ये विविध उपक्रमही राबविले आहेत.

सिद्धिविनायकपूरमचे उपाध्यक्ष उदय माळी म्हणाले की, सोसायटीत शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी राहत असल्याने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन होते. सोसायटीने तातडीने मुख्य प्रवेशद्वार बंद केले. प्रत्येक सभासदांना कोरोनाची माहिती दिली. काहीजण बाहेरगावी जाऊन आल्याने त्यांची माहिती प्रशासनाला दिली. त्यांना होम क्वारंटाईन केले आहे.

स्वयंभू सृष्टीचे अध्यक्ष रणजित चव्हाण म्हणाले की, सोसायटीतील सभासदांची बैठक घेऊन कोरोनाबाबत जागृती केली. सोसायटीत दोन ते तीन फ्लॅटधारक मुंबईचे आहेत. त्यांनाही सांगलीला येऊ नका, असे कळविले. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. घरकामासाठी येणाऱ्यांना प्रवेशबंदी केली.

राजयोग सोसायटीचे अध्यक्ष अनिल जाधव, डॉ. शीतल चौगुले म्हणाले की, सोसायटीचे प्रवेशद्वार प्रथम बंद केले. प्रत्येक फ्लॅटबाहेर साबण व पाण्याचे बकेट ठेवले आहे. घरात प्रवेश करताना पाण्याने पाय धुऊनच प्रवेश दिला जातो. लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी हात सॅनिटायझर केले जात आहेत. भाजीपाला, दूध खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात आहे. 

रतनशीनगर, गिरनार, तुलसी, भारत कॉम्प्लेक्स या सोसायट्यांचे प्रवेशद्वार पूर्णपणे बंद केले. गुजराती सेवा समाजतर्फे प्रत्येक सदनिकेत मोफत मास्क व फिनेल दिले. सोसायटीत नियमितपणे औषध फवारणी केली जात आहे. सभासदांना सोशल डिस्टन्सिंग व मास्कची सक्ती केली आहे.- दीपक शहा, सचिव, गुजराती सेवा समाज, सांगली 

वृंदावन व्हिलाज्मध्ये घरकाम करणाºयांना बंदी केली आहे. प्रवेशद्वार बंद ठेवले आहे. भाजीपाला, दूध व इतर खरेदी प्रवेशद्वारावर करण्यास बंधन घातले आहे. प्रवेशद्वारावर तुरटी, मीठ, ब्लिचिंग पावडरचे द्रावण तयार केले असून ते दुचाकी, चारचाकीवर फवारणी करूनच वाहनांना प्रवेश दिला जातो. घरकामासाठी येणाºया महिलांना जीवनाश्यक वस्तूंचे कीट दिले आहे.- अविनाश पाटणकर, अध्यक्ष, वृंदावन व्हिलाज्.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगली