शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: योगेवाडीजवळ बस-कंटेनरची भीषण धडक, नऊ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:07 IST

गणपतीपुळेला जाताना घटना 

तासगाव : गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या आनंदयात्रेला आज, मंगळवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. तासगाव तालुक्यातील योगेवाडी फाट्याजवळ कंटेनर, एसटी बसचा भीषण अपघात झाला. या धडकेत बसचालकासह नऊ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.अपघात गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनास्थळी क्षणभरातच भीषण ओरड, धावपळ आणि रक्तबंबाळ दृश्य निर्माण झाले. काही काळ महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.जखमींमध्ये बसचालक गोरख तुकाराम पाटील (वय-४५) यांच्यासह मालन दत्तात्रय पाटील (७०), काजल विशाल पाटील (३०), रुक्मिणी भीमराव पवार (५५), कमल वसंत पवार (६०), सुलाबाई गणपतराव पाटील (६०), रंजना दिलीप पाटील (४५), आदिरा विशाल पाटील (७) व शालन वसंत पाटील (५५) या प्रवाशांचा समावेश आहे.घटनास्थळी योगेवाडीचे पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी, मणेराजुरीचे पोलीस पाटील दीपक तेली यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना प्रथम तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.