शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: डम्परच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार, दीड वर्षापूर्वी झाला होता विवाह; पती गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:37 IST

जमावाकडून डम्पर चालकास चोप

सांगली : विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव डम्परने मोपेडला धडक दिल्यामुळे पतीसह नोकरीला निघालेली पूनम सुशांत जाधव (वय २५, रा.कवलापूर, ता.मिरज) ही नवविवाहिता ठार झाली, तर पती सुशांत जाधव हे गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने डम्पर चालकास चोप दिला. संजयनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन डम्पर चालक श्रीकांत नंदकुमार लमाण (रा.कुणीकोणूर, ता.जत) याला ताब्यात घेतले.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, पूनम आणि सुशांत यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. पूनम या विश्रामबाग येथील कल्लोळी हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या, तर सुशांत हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कार्यरत आहेत. दोघेही मोपेड (एमएच १० डीएन ५१००) वरून एकत्र कामावर येत होते. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दोघे घरातून बाहेर पडले. साडेदहाच्या सुमारास कुपवाडहून लक्ष्मी देवळाकडून विश्रामबागला उड्डाणपुल चढून येत असतानाच, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या काँक्रीट मिक्सर डम्पर (एमएच १७ बीडी ९१२२) ने जोराने धडक दिली. धडकेत पूनम खाली पडून त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच ठार झाल्या, तर सुशांत हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर पुलाजवळील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. पळून जाणाऱ्या डम्पर चालकाला अडवून त्याला चोप दिला. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी दोघांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच पूनम यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी डम्पर चालक श्रीकांत नंदकुमार लमाण याला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

अर्ध्यावरती डाव मोडलापूनम आणि सुशांत यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. दोघेही नोकरी करून संसाराचा गाडा ओढत होते. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती, परंतु एका अपघाताने पूनम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्ध्यावरती डाव मोडला गेला. अपघाताची माहिती कुटुंबीयांना समजताच दु:खाचा डोंगरच कोसळला.

उपचारापूर्वीच मृत्यूडंपरने धडक दिल्यानंतर पूनम यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्या निपचित पडल्या होत्या. बाजूलाच जेवणाचा डबा अन् पाण्याची बाटलीही पडली होती. दोघांना एकाच वाहनातून खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात नेले. पूनम यांचा मृत्यू झाल्याचे सांगताना डॉक्टरांनी ‘सॉरी’ असा शब्द उच्चारताच सुशांत यांच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन ते कोसळले.