शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

खोकीधारकांच्या सर्व्हेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2015 00:30 IST

खोकीधारकांच्या सर्व्हेची गरज

अशोक पाटील- इस्लामपूर शहरातील खोकीधारकांसाठी पालिकेने ठराविक आकाराची खोकी तयार करुन बसविण्याची योजना अंमलात आणली आहे. याचे व्यावसायिक व सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. परंतु गरजू व गरीब व्यावसायिकांना काहींनी आपली खोकी भाड्याने दिली आहेत. त्यामुळे अशा खोक्यांचा पालिकेने सर्व्हे करुन, जो तेथे स्वत: व्यवसाय करेल, त्यालाच पालिकेचे खोके द्यावे. तसेच खोक्याचे भाडे घेणाऱ्या मालकांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.इस्लामपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरातील रस्त्यांचा प्रश्न बिकट होत चालला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर बेकायदेशीर खोक्यांचे साम्राज्य असल्याने वाहतुकीचीही मोठी कोंडी होत आहे. यावर पालिकेने चांगला पर्याय शोधून काढला आहे. ज्या ज्या ठिकाणी खोक्यामध्ये व्यवसाय सुरु आहे, त्याठिकाणी एका ठराविका आकाराची पत्र्याची खोकी पालिकेने देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही खोकी रस्त्याच्या एका बाजूने एका आकारात बसविण्यात येत असल्याने, शहराच्या सौंदर्यातही भर पडत आहे. तसेच पालिकेच्या उत्पन्नातही यामुळे वाढ झाली आहे.सध्या व्यावसायिकांकडून एका खोक्यासाठी २२ हजार रुपये डिपॉझीट घेतले जात आहे. तसेच दररोज नाममात्र भाडे घेतले जाणार आहे. त्यामुळे या खोक्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु बहुतांशी खोकी मालक वेगळे आणि त्यामध्ये व्यवसाय करणारे वेगळे आहेत. पालिकेने दिलेले खोके खोकी मालक भाड्याने व्यवसाय करणाऱ्यांना देत आहेत. यामध्ये सर्वसामान्य व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागत आहे. अशा खोकी मालकांचा पालिकेने सर्व्हे करुन, ‘एक तर स्वत: व्यवसाय करा, अन्यथा खोके सोडा’, असा निर्णय घेण्याचा पवित्रा घ्यावा, अशीही मागणी होत आहे.शहरातील अनेक ठिकाणी पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या खोकी मालकांची खोकी आहेत. यातील काहींनी व्यवसाय बंद केला असला तरी, खोकी काढलेली नाहीत. जी खोकी बंद अवस्थेत त्या मालकांकडे आहेत, ती इतर व्यावसायिक भाड्याने मागतात. परंतु असे खोकी मालक खोक्याची जागा स्वत:च्याच मालकीची असल्याचा आव आणत लाखो रुपयांना खोके विकतात. अशा बऱ्याच घटना घडत आहेत. याचीही दखल पालिकेने घेणे गरजेचे आहे.शहरातील सर्वसामान्य व्यावसायिकांना पालिकेने दिलेल्या खोक्यांमध्ये गोलमाल झाला आहे. या खोक्यांना वापरलेला पत्रा हलक्या दर्जाचा आहे. दरम्यान, कोणताही ठराव न करता सत्ताधाऱ्यांनी ही खोकी बसविण्याचा घाट घातला आहे. पूर्वीच्या जागेवर असलेल्या खोकी मालकांना नवीन खोकी न देता, तोडपाणी करणाऱ्याला जागा व खोके उपलब्ध करुन दिले जात आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.कागलच्या ठेकेदाराला काम देण्याचा उद्देश काय?पालिकेने शहरातील खोकी बनविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा याचे काम स्थानिक व्यावसायिकांना मिळावे, अशी मागणी केली होती. परंतु पालिकेने याचा अलिखित ठेका कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील व्यापाऱ्यांना दिला आहे. इस्लामपूर शहरात अशी खोकी तयार करुन देणाऱ्या फॅब्रिकेटर्स व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. हे काम आम्हाला मिळाले असते, तर शहरातील कारागीरांच्या हाताला काम मिळाले असते, असे वाळवा तालुका फॅब्रिकेशन असोसिएशनचे अध्यक्ष मीनाज दिवाण म्हणाले.