शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगली: कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांना झटका, नगराध्यक्षपदी संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 15:36 IST

कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पहिल्यांदाच मोठी चुरस पाहायला मिळाली.

महेश देसाई

शिरढोण: कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटलांना धक्का देत खासदार संजयकाका पाटील गटाने विजयी बाजी मारली. सिंधुताई गावडे या चिठ्ठीने नगराध्यक्ष झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक फुटल्याने राहूल जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी दोन अर्ज माघार घेतले आणि राष्ट्रवादीचे राहूल जगताप विरूद्ध खासदार पाटील गटाच्या  सिंधुताई गावडे यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले. आज, शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात उमेदवार सिंधुताई गावडे आणि राहूल जगताप यांना आठ आठ अशी समान मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका जयश्री लाटवडे गैरहजर राहिल्याने समान मते पडली.यानंतर चिठ्ठीद्वारे सिंधुताई गावडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. गावडे यांच्या निवडीची घोषणा समिर सिंगटे यांनी केल्यानंतर खा.पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळन करीत जल्लोष केला. खासदार संजयकाका पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांनी नुतन नगराध्यक्षा गावडे यांचा सत्कार केला. कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पहिल्यांदाच मोठी चुरस पाहायला मिळाली.

दहा महिन्यापुर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीची महाराष्ट्रभर चर्चा झाली. खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या पँनेल विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार सुमनताई पाटील, जि.म. बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अशी लढत होऊन राष्ट्रवादीला दहा जागा आणि विरोधी पँनेलला सात जागा मिळाल्या. नगराध्यक्षपद हे खुल्या गटाकडे आले. अश्विनी महेश पाटील या नगराध्यक्ष बनल्या. त्यांनी सात महिन्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक लागली.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा खेळ बिघडवला. चार सदस्य फुटून ते थेट संजयकाका पाटील यांना जावून मिळाले. मात्र माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना पाठींबा देण्यास नकार देवून दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहूल जगताप यांना पाठींबा दिला. त्यामुळे जगताप व गावडे यांना समान मते मिळाली. व चिठ्ठीद्वारे सिंधुताई गावडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा