शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जलसंपदाच्या पाण्यावर जयंतरावांचं सिंचन, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांसाठी 'मार्केटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:14 IST

जिल्ह्यातल्या कोणत्याही निवडणुकीच्या हाका सर्वांत आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना ऐकू येतात.

श्रीनिवास नागे

जिल्ह्यातल्या कोणत्याही निवडणुकीच्या हाका सर्वांत आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना ऐकू येतात. येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका होताहेत, त्याही पुढच्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जयंतरावांना दिसू लागल्यात. त्यामुळेच जलसंपदासारख्या मलईदार खात्याच्या पाण्यावर त्यांनी जिल्हाभरात राष्ट्रवादीचं सिंचन सुरू केलंय. सत्तेतून बाहेर फेकलेला भाजप कानकोंडा झालाय, तर सत्तेतल्या काँग्रेस-शिवसेनेच्या हाती हे सगळं मुकाट बघत बसण्याशिवाय काही राहिलेलं नाही.पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद हातात. जिल्ह्यावर मांड ठोकायची, तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात हव्यातच. त्या जोरावर पक्षातला रुबाब वाढतो, तो वेगळाच. मुरब्बी जयंतराव हे जाणतात. त्यासाठी त्यांनी हातातल्या जलसंपदा विभागाचा पुरेपूर वापर केलाय. जिल्ह्याचं राजकारण पाण्यावर फिरत असल्यानं सिंचनाच्या कामांचा धडाका लावलाय. जिल्ह्यात ३८५८ कोटींची सिंचनाची कामं पाईपलाईनमध्ये असल्याचं त्यांनी सर्वांत आधी जाहीर केलंय. जलसंपदा आणि पालकमंत्री म्हणून हे जाहीर करण्याची केवढी ती घाईगडबड! या कामांचं श्रेय केवळ स्वत:ला! ज्या-ज्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघासाठी प्रस्ताव दिले, त्यांनीही बोलायचं नाही.बोललंच तर, जयंतरावांचे प्रयत्न ठासून सांगायचे. काय बिशाद आहे, याविरोधात जायची! शिवाय जिल्हाभरातली राष्ट्रवादीची टीम आहेच, ढोल बडवायला. सगळीकडं सुरू असलेले पाणीपूजन सोहळे वेगळेच. जिल्ह्यातलं एकही गाव कृष्णा-वारणेच्या पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, असं ठासून सांगायचं.

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर असताना या कामांचं मार्केटिंग झालं नसतं, तरच नवल! जिल्हा परिषदेतली सत्ता हातात नसल्याचं शल्य जयंतरावांना जाचतंय. या निवडणुकीच्या हाका ऐकू आल्यानंच त्यांनी परिवार संवाद यात्रा काढून राज्य ढवळून काढलं. अदमास घेतला. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातली शक्तिस्थळं आणि कमकुवत धागे त्यांनी टिपलेत. आघाडी झाली तर आणि नाही झाली तर काय करायचं, याची गणितं मांडलीत. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेला जाग येण्याआधीच ‘दे धक्का’ श्रेय लाटण्याचा!

भाजप कानकोंडा, तर काँग्रेस-शिवसेनेवर कुरघोडी

  • भाजपच्या दोनपैकी सांगलीच्या आमदारांच्या मतदारसंघात जलसिंचनाच्या कामांचा संबंध नाही, तर मिरजेच्या आमदारांना नक्की मतदारसंघातले प्रश्नच माहीत नाहीत. राष्ट्रवादीचे शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार सोबतच असतात. पण पलूस-कडेगाव आणि जत इथं काँग्रेसला, तर खानापूर-आटपाडीत शिवसेनेला बोलण्याची फुरसतही जयंतराव देत नाहीत.
  • जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटकातल्या तुबची-बबलेश्वर योजनेतून कमी खर्चात पूर्व भागात पाणी आणण्याचा प्रस्ताव मांडला होता, तो कधीच गुंडाळला गेलाय. उलट तिथल्या ६४ गावांसाठी सातशे कोटी खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं काम जयंतरावांनी रेटलंय. आता खानापूर-आटपाडीत टेंभू योजनेसाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या अनिल बाबरांवर कुरघोडीसाठी राष्ट्रवादी उठून बसलीय. जोरात चाललंय राष्ट्रवादीचं सिंचन.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक