शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

राजकारणाचा दरबार, काँग्रेसला बुडवणार; सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वारू बेफाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:41 IST

सतत उफाळून येणारी गटबाजी, कार्यकर्ते सांभाळताना होणारी दमछाक, निष्क्रियता आणि दरबारी राजकारण यामुळं आगामी निवडणुकांत ‘हात दाखवून अवलक्षण’ तर होणार नाही ना, असा सवाल काँग्रेसप्रेमीच विचारताना दिसतात.

श्रीनिवास नागेराज्यातील सत्तेच्या जोरावर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वारू बेफाम सुटला असताना त्याच सत्तेतला काँग्रेस पक्ष मात्र नेहमीसारखा थंड आहे. इथं ‘वरून’ येणारे कार्यक्रम फोटोपुरते साजरे करण्यातच धन्यता मानली जाते. सतत उफाळून येणारी गटबाजी, कार्यकर्ते सांभाळताना होणारी दमछाक, निष्क्रियता आणि दरबारी राजकारण यामुळं आगामी निवडणुकांत ‘हात दाखवून अवलक्षण’ तर होणार नाही ना, असा सवाल काँग्रेसप्रेमीच विचारताना दिसतात.जिल्हाभरात मजबूत असलेली काँग्रेस कमजोर झालीय. पलूस - कडेगाव, जत इथं पक्षाचे आमदार, पण त्यांनाही विरोधक प्रबळ. वाळवा - शिराळ्यात तर पक्ष औषधापुरता राहिलेला. खानापूर - आटपाडी, तासगाव - कवठेमहांकाळमध्ये थोडेफार कार्यकर्ते, पण तेही गटागटात विखुरलेले. तिथं कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच जादा... आणि जेवढे नेते तेवढे गट! विधानसभेच्या सांगली - मिरज मतदारसंघात तेच चित्र. इथं कानामागून आलेली राष्ट्रवादी तिखट झालेली. आघाडी शाबूत राहिली तर विधानसभेला दोन्ही मतदारसंघांची तिकिटं काँग्रेस हातातून घालवणार, असे प्रत्येकाचे सवतेसुभे.

काही पक्ष निवडणुका आल्यावर जागे होतात. पण काँग्रेस तेव्हाही निष्क्रियच, हे अलीकडचं ठळक चित्र. आधीच कदम-दादा गट आणि उपगटात पक्ष विखुरलेला. त्यात नेत्यांचं दरबारी राजकारण. आपापला दरबार जपत सोयीचं राजकारण करायचं. त्यामुळं जिल्हाभरात पसरलेला काँग्रेसप्रेमी अवघ्या काही तालुक्यांपुरता उरलाय. पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांच्या पश्चात खमक्या नेतृत्त्वाचा अभाव अधोरेखित होतोय.

चार नेत्यांच्या चार तऱ्हा

जिल्हाध्यक्ष सांगलीत मुक्कामास कधी?

  • जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर आमदार विक्रम सावंत यांनी नजरेत भरण्यासारखं केलेलं काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे टोमणे कार्यकर्ते खासगीत मारतात. पक्षसंघटन तर दूरच.
  • आमदार सावंत जतचे. तिथून सांगलीत यायचं म्हटलं की, शंभर किलोमीटरचा पल्ला पार करावा लागतो. शिवाय मतदारसंघात मित्रपक्षांचीच लुडबूड जास्त. परिणामी तिथं अडकून पडल्यानं त्यांचे सांगली दौरे दुर्मीळच. जिल्हाभरातल्या त्यांच्या दौऱ्यांचं संशोधन करावं लागेल, ही स्थिती. त्यामुळं सांगलीतले कार्यक्रम साजरे करण्याची, बैठका घेण्याची जोखीम शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर. 

जबाबदाऱ्याच जास्त, मग वेळ कसा काढणार?

  • विश्वजित कदम यांच्यावर राज्याची म्हणजे कृषी आणि सहकार या दोन तगड्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. त्यात पार राज्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद. भारती विद्यापीठ आणि इतर सहकारी संस्थांचा कारभारही त्यांच्याकडंच.
  • स्वत:च्या पलूस - कडेगाव मतदारसंघावर लक्ष ठेवावं लागतं, ते वेगळंच! त्यामुळं सांगलीसाठी वेळ काढताना त्यांची दमछाक होताना दिसते.
  • पलूस - कडेगाव, जत या मतदारसंघांसोबत महापालिकेत त्यातही सांगली शहरातच त्यांचे लक्षणीय कार्यक्रम. त्यांचे चुलते आ. मोहनशेठ मुरब्बी, जुनेजाणते राजकारणी; पण वयोमान, प्रकृतीमुळं त्यांना फारसं लक्ष देता येत नाही. 

कारखाना गेस्ट हाऊसमधून आता तरी सोडणार का?वसंतदादांचे नातू तथा वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील द्विधा मनस्थितीत. आमदारकी लढवायची की खासदारकी, या पेचात. राज्याचं उपाध्यक्षपद असूनही उद्योग सांभाळताना कारखान्याच्या गेस्ट हाऊसमधून बाहेर पडणं होत नाही. काँग्रेस कमिटीशेजारी घरचं कार्यालय असूनही ते तिथं कधी बसलेले नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांच्या कौटुंबीक सुख-दु:खाच्या प्रसंगात त्यांची हजेरी ठरलेली. पण ती गट सांभाळण्यापुरती. ‘होय-नाही’ करण्यात वेळ गेल्यानं मागच्या लोकसभेवेळी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढावं लागलेलं. आताही त्याच कात्रीत. उलट आता सांगली लोकसभा - विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीनं दावा केलेला...

गट सांभाळताना नाकीनऊ येतंय...

मदनभाऊ पाटील यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी जयश्रीताई यांच्याकडं गट सांभाळण्याचा भार. जिल्हाभरातला भाऊंचा गट आता सांगली - मिरजेपुरता मर्यादित राहिलाय. त्यातही महापालिकेत या गटाची ताकद दिसणारी. पण अलीकडं काही मोहरे विश्वजित कदम यांच्याकडं तर काहीजण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडं गेलेले. आहेत त्यांना सांभाळतानाच नाकीनऊ येतंय. जयश्रीताईंना जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद मिळालंय. पण मदनभाऊंच्या हिकमती नेतृत्त्वाची उणीव कायम जाणवणारी.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसJayant Patilजयंत पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदम