शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पाच हजाराहून अधिक प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 7:46 PM

Sangli : या लोक अदालतीमध्ये कोरोनामुळे जे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नव्हते अशांसाठी ऑनलाईन पध्दतीचाही वापर करण्यात आला. जिल्हा न्यायालय सांगली, जिल्हा न्यायालय इस्लामपूर, दिवाणी न्यायालय विटा व दिवाणी न्यायालय जत अशा चार ठिकाणी ऑनलाईन लोकअदालत पॅनल तयार करण्यात आले होते.

सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. लोक अदालतीसाठी जिल्हयातून 54 पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 5 हजार 11 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. विश्वास माने यांनी दिली आहे. या लोक अदालतीच्या सुरूवातीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष विजय पाटील यांनी सर्व पॅनल न्यायाधीश व सदस्यांना जास्ती जास्त प्रकरणामध्ये समजोता घडवून आणून प्रकरणे तडजोडीने निकाली करावी असे आवाहन केले.     या लोक अदालतीमध्ये कोरोनामुळे जे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नव्हते अशांसाठी ऑनलाईन पध्दतीचाही वापर करण्यात आला. जिल्हा न्यायालय सांगली, जिल्हा न्यायालय इस्लामपूर, दिवाणी न्यायालय विटा व दिवाणी न्यायालय जत अशा चार ठिकाणी ऑनलाईन लोकअदालत पॅनल तयार करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार व्हिडिओ, कॉन्फर्न्सव्दारेही पक्षकारांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माधवनगरचे व्यवस्थापक यांनी सांगली जिल्हा न्यायालयामध्ये उपस्थित राहून बँकेच्या काही प्रकरणामध्ये तडजोड केली.

सदर बँकेचे विटा न्यायालयातही 2 प्रकरणे तडजोडीसाठी होती. या प्रकरणाचे तडजोड पत्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ताब्यात त्यांनी दिले. ते विटा येथील संबधीत पॅनलचे न्यायाधीशांना पाठविण्यात आले व त्या न्यायाधीशांनी व्यवस्थापकाशी बोलणे करून, ओळखीची खात्री करून सदर 2 प्रकरणे निकाली केले. अशा पध्दतीने जिल्हयात एकूण 9 प्रकरणामध्ये तडजोड करणत आली त्यामुळे पक्षकारांना घर बसल्या न्याय मिळाला. लोक अदालतीच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन दिवस स्पेशल ड्राइव्हमध्येही प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.  

या  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेली प्रकरणे पुढीलप्रमाणे - जिल्हा न्यायालय सांगली 993, इस्लामपूर न्यायालय  902, आटपाडी 90, जत  330,  कडेगांव  281, 6) कवठेमहांकाळ  331, मिरज  431, पलूस  264, शिराळा 768, तासगांव  322, विटा  245 या पुढील राष्ट्रीय लोक अदालत दि २५ स्पटेंबर २०२१ रोजी होणार असल्याचे माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव विश्वास माने, सांगली यांनी दिली व  नागरिकांनी लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय