शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:12 AM

खरसुंडी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिध्दनाथाचा सासनकाठी उत्सव सोहळा ‘नाथबाबांच्या नावानंं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत, लाखो भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी पार पडला.डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य सासनकाठी सोहळा पाहण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून लाखोच्या संख्येने भाविक नाथनगरीत दाखल झाले होते. दुपारी श्रीनाथ मंदिरात आटपाडीचे मानकरी माजी ...

खरसुंडी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिध्दनाथाचा सासनकाठी उत्सव सोहळा ‘नाथबाबांच्या नावानंं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत, लाखो भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी पार पडला.डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य सासनकाठी सोहळा पाहण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून लाखोच्या संख्येने भाविक नाथनगरीत दाखल झाले होते. दुपारी श्रीनाथ मंदिरात आटपाडीचे मानकरी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याहस्ते मानपान आणि विधिवत धुपारती करून सासनकाठी उत्सवास सुरुवात झाली. पालखीचे श्रीनाथ मंदिराकडून जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान झाले. मंदिर आवारातून विविध गावांतून मानाच्या सासनकाठ्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत दाखल झाल्या. मंदिरातून श्रींची धुपारती, भालदार, चोपदार, छत्र, चामर, सेवेकरी, मानकरी असा शाही लवाजमा मुख्य बाजारपेठेतून जात असताना, सभोवताली लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविकांनी गुलाल, खोबºयाची उधळण केली. ‘नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली. गुलाल, खोबºयाची उधळण झेलत श्रींची पालखी आणि मानाच्या सासनकाठ्या मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिर चौकात दाखल झाल्या. जोगेश्वरी पटांगणात सर्व सासनकाठ्या पालखीस भेटवून मानवंदना दिली. जोगेश्वरी मंदिरात मानकºयांच्या उपस्थितीत पानसुपारी आणि मानपान कार्यक्रम होऊन पालखी पुन्हा श्रीनाथ मंदिराकडे आली. हा उत्सव सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडत असताना, लाखो भाविकांचा महापूर सिध्दनाथनगरीत आला आणि गुलालाने न्हाऊन निघाला.गुलाल, खोबºयाची दुकाने, छोटी-मोठी हॉटेल्स, खानावळी, मिठाई, खेळण्यांची दुकाने यामुळे बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. यात्रेनिमित्त खिलार जनावरांची मोठी आवक झाली. भक्तांनी पिण्याच्या पाण्याची आणि महाप्रसादाची सोय केली होती. गावाबाहेर पार्किंग व्यवस्था करून चारचाकी वाहनांना आत सोडले नसल्यामुळे अडथळा झाला नाही.