शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या नंदूची एक्झिट अनेकांना चटका लावणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील बुरूड गल्ली परिसरातील नंदू ऊर्फ नंदकुमार शिवाजी सूर्यवंशी (वय ४०) याचे हृदयविकाराने निधन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील बुरूड गल्ली परिसरातील नंदू ऊर्फ नंदकुमार शिवाजी सूर्यवंशी (वय ४०) याचे हृदयविकाराने निधन झाले. शहरामध्ये तो नंदू या नावाने परिचित होता. पाच फूट उंची, धिप्पाड शरीरयष्टी, रापलेला काळा गोल चेहरा, त्यावर उठून दिसणारी पांढरी दाढी आणि डोक्यावरचे पांढरे केस तसेच विजार आणि शर्ट परिधान करून शहराच्या काेनाकोपऱ्यात मुक्त संचार असणाऱ्या नंदूची एक्झिट शहरवासीयांच्या मनाला चटका लावून गेली.

नंदूने शाळेचे तोंड बघितले नसले तरी त्याच्याकडे समाजात वावरताना लागणारे व्यावहारिक शहाणपण मात्र मोठे होते. कधीही कोणाशी वेडेवाकडे न बोलता नेहमी आर्जवाची भाषा आणि त्याची डोळ्यांतील ममता कित्येकांच्या मनात घर करून राहिली आहे. शहरात सगळीकडेच त्याचा वावर असल्याने कुठे गर्दी दिसेल त्या गर्दीत तो हरवून जायचा. मग कधी टाळमृदंगाच्या निनादात तल्लीन व्हायचा; तर कधी डोल्यांसमोर ढोल-ताशा वाजवत बेफाम व्हायचा. गणेशोत्सव, नवरात्राैत्सवात ध्वजधारी असायचा.

दिवसभराच्या भ्रमंतीत नंदूला खाण्या-पिण्याचे अथवा चहा-नाष्ट्याचे कधीच कमी पडले नाही. आपलाच नंदू या हक्काने सर्वजण त्याला खाऊ-पिऊ घालत. कधी-कधी तो पैसेही मागायचा. मात्र कुणी न दिल्यास रागही मानत नव्हता. नंदू हा शहराच्या राजकीय परिभाषेचा केंद्रबिंदू ठरला होता. तसेच वाढदिवसाच्या झगमगाटावर उपरोधिकपणे पांघरूण घालणारा आयकॉनही ठरला होता. पंधरा वर्षांपूर्वी शहरामध्ये वाढदिवसांचे वॉर उफाळून आले होते. बॅनरच्या गर्दीने संपूर्ण शहराचे विद्रूपीकरण झाले होते. या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी वाळव्याच्या विजयकुमार पाटील यांनी थेट नंदूचाच वाढदिवस साजरा करीत त्याचे मोठे बॅनर तहसील कार्यालयाजवळ लावले होते. यामुळे शहरातील अनेकांनी आपल्याला नंदू म्हणू नये, या भीतीने आपल्या वाढदिवसाला आणि बॅनरबाजीला पायबंद घालून घेतला होता. नंदू अविवाहित होता. त्याच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.