शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नलवडे कॉलनी चोरी प्रकरण; तीन आरोपींना मध्यप्रदेशातून मुद्देमालासह अटक, शिराळा पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 00:54 IST

या संशयितांचे दि.२० एप्रिल रोजी जालना, बीड, अंबेजोगाई, पैठण  या परिसरात वास्तव होते त्यादरम्यान या परिसरात घरफोड्या झाल्या आहेत.

सांगली/शिराळा - नलवडे कॉलनीमध्ये झालेल्या चोरीतील पाच संशयितांपैकी तिन जणांना मध्यप्रदेशातील टांडा ( जि. धार) येथून मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. शिराळा पोलिसांनी एस टीचे तिकीट आणि मोबाईल लोकेशनचा वापर करत या संशयितांना अटक केली.

रमेश केशरसिंह मेहडा (वय ३२ ), महेंद्र केशरसिंह मेहडा (वय २९ ) (दोघेही राहणार भुरीयापुरा पी. भुतिया, ता गंधवानी) आणि मनोज जुवानसिंह वास्केल( वय २४ रा . मुहाजा ता . कुक्षी जि . धार),  अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर समरसिंह रतनसिंह भुरीया आणि अर्जुन ऊर्फ भुरू वसुनिया (दोघेही रा. भुतिया ता. गंधवानी जि. धार मध्यप्रदेश) अशी फरारी संशयित आरोपींची नावे आहेत. या टोळी कडून देशातील विविध राज्यातील चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

येथील नलवडे कॉलनी येथील ४ जून रोजी वनिता पोवार यांच्या घरातून १० तोळे सोने, स्टेट बँक ऑफ इंडिया सेवा केंद्र येथील ५५ हजार रुपये रोख तसेच अमन इम्तियाज मुल्ला यांची (एम एच१० डी के ५५२०) व शैलेश गायकवाड याची ( एम एच १० यु ८०६७ ) मोटारसायकल चोरीस गेली होती.

पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेली एस टी बसेसची तिकिटे, शिराळा, पेठ आणि इस्लामपूर येथील सिसिटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यावरून मनोज वास्केल यास टांडा येथे सापळा रचून अटक केली. त्याच्या माहितीवरून रमेश  मेहडा,  महेन्द्र मेहडा या दोघांना भूतीयापुरा येथे अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने, मोबाईल व पंधराशे पन्नास  रुपये रोख रक्कम हस्तगत केली. यावेळी इतर दोघे संशयित फरारी झाले. तसेच कराड व कासेगाव जवळ संशयितांनी सोडलेल्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या. 

हा तपास पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश  चिल्लावार, पोलीस उपनिरीक्षक, अविनाश  वाडेकर,कालीदास गावडे,  संदीप पाटील,  नितीन यादव,  अमर जाधव , प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, टांडापोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय बास्केल, भानुप्रतापसिंह राजपुत यांनी ही कारवाई केली.

१) नलवडे कॉलनी जवळील सचिन उबाळे हे अमेरिकेत असतात त्यांना त्यांचा घराबाहेर बसवलेला सिसिटीव्ही हलवल्याचा मेसेज आला त्यावेळी त्यांनी रात्रीच अमेरिकेतून कॉल करून शिराळा पोलिसांना कल्पना दिली. तातडीने पोलीस त्या ठिकाणी गेले असता पोलिसांना पाहून एकमेकांना मोबाईल वरून फोन केले. यामुळे या संशयितांचे मोबाईल क्रमांक सायबर क्राईम कडून मिळाले. त्यामुळे तपासाला वेग आला. २) हे संशयित हिरुगडे ते कागवड, कागवड ते मिरज, मिरज , इस्लामपूर असा प्रवास करून शिराळ्यात आले.२) या संशयितांचे दि.२० एप्रिल रोजी जालना, बीड, अंबेजोगाई, पैठण  या परिसरात वास्तव होते त्यादरम्यान या परिसरात घरफोड्या झाल्या आहेत.३) शिराळा पोलिसांनी दोन हजार किलोमीटर प्रवास करत संशयितांना जीव धोक्यात घालून अटक केली.४) उपविभागीय पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी, दोन फरारी संशयितांना मुद्देमालासह लवकरच अटक करू तसेच ज्यांनी या टोळीस पकडले त्यांना जास्तीत जास्त रक्कम बक्षीस देण्याची शिफारस करू, असे पत्रकार परिषदेत सांगितले.५) टांडा हा सर्वात धोकादायक भाग आहे येथे खून , दरोडे ,मारामारी आदी प्रकरणांतील गुन्हेगार आहेत.जवळपास दोन हजार पेक्षा जास्त वॉरंट शिल्लक आहेत. या गुन्ह्यातील संशयितांच्या नातेवाईकानी तांडा पोलीस ठाण्यावर गतवर्षी हल्ला व गोळीबार केला होता. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर