शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनी २२ ला कार्यक्रम

By admin | Updated: March 16, 2016 23:54 IST

वैभव नायकवडी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची उपस्थिती

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा चौथा स्मृतिदिन २२ मार्च रोजी साजरा होत आहे. अण्णांचे विचार व कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचून राष्ट्र उभारणीस स्फूर्ती व प्रेरणा मिळावी, या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली. नायकवडी म्हणाले की, नागनाथअण्णा व समाजवादी विचारसरणीचा दृढ संबंध होता. यामुळेच देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. सातारचे माजी खासदार प्रतापराव भोसले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आमदार पतंगराव कदम, कुसूमताई नायकवडी यांच्यासह राज्यभरातून चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. २२ रोजी सकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत समाधीस्थळी आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता हुतात्मा विद्यालयाच्या पटांगणावर जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमास नागनाथअण्णांवर प्रेम करणारे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, धरणग्रस्त संघटना, साखर कामगार, शैक्षणिक, सहकारी, सांकृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सुमारे ५१ हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती गृहित धरली असून, त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे, असे नायकवडी यांनी सांगितले.क्रांतिवीर नागनाथअण्णांसारख्या नेत्याचा आदर्श तरूण पिढीस कळावा आणि भारत देश बलवान व्हावा, यासाठी तरूण कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नायकवडी यांनी केले. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा वंदना माने, माजी अध्यक्ष महादेव कांबळे, दूध संघाचे अध्यक्ष व वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, उपाध्यक्ष भगवान पाटील, बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, हुतात्मा किसन अहिर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. होरे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. कांबळे, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस, दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक, बझारचे व्यवस्थापक मारूती चव्हाण यांच्यासह हुतात्मा संकुलातील कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार नागनाथअण्णा व समाजवादी विचारसरणीचा दृढ संबंध होता. यामुळेच देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. सातारचे माजी खासदार प्रतापराव भोसले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आ. पतंगराव कदम उपस्थित राहणार आहेत.