शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 2:14 PM

कोरोना बाधित रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा : जयंत पाटीलजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

सांगली : कोरोना बाधित रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा. या मोहिमेबाबत लोकांच्यामध्ये जनजागृती करा. यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन लोकांमध्ये जागरूकता करावी. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंंगाने काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचनांच्या पत्रकाचे वाटप करावे व सर्व्हे चांगला करून घ्यावा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सर्व रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचाराच्या प्रोटोकॉलचे अनुसरण योग्य प्रकारे केले जाते का यासाठी तपासणी पथकाव्दारे पहाणी करून काही त्रुटी असतील तर त्या दुरूस्त कराव्यात. शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे देयक आकारणी होते का ते पहावे.

हॉस्पीटलमध्ये दरपत्रक लावावे. आवश्यक औषधांची उपलब्धता करावी. रूग्णांना चांगले व योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, खाजगी व उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमवेत तज्ज्ञ डॉक्टरांशी झूम मिटींग घेण्यात येईल, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुकानिहाय कोरोना रूग्णांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध असलेल्या व नव्याने विविध ठिकाणी उपलब्ध करण्यात येत असलेल्या बेड्सबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या ठिकाणी विहीत वेळेत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली