मुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 08:09 PM2020-07-16T20:09:26+5:302020-07-16T20:42:09+5:30

महापालिकेच्या सावली निवारा केंद्राला कोरोना विळखा बसला असून ५२ बेघरांना कोरोनाची लागण झाली. यामुळे महापालिका क्षेत्र हादरले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील जयंत पाटील यांनी केंद्राचे समन्वयक व इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना 'काळजी करु नकोस, सर्व रुग्ण बरे होतील', अशा शब्दात ट्विट करत दिलासा दिला.

Mustafa, don't worry, all the coronaries will be healed! | मुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील!

मुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील!

googlenewsNext
ठळक मुद्देमुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील!जयंत पाटील यांनी ट्विट करुन दिलासा

सांगली : महापालिकेच्या सावली निवारा केंद्राला कोरोना विळखा बसला असून ५२ बेघरांना कोरोनाची लागण झाली. यामुळे महापालिका क्षेत्र हादरले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटीलजयंत पाटील यांनी केंद्राचे समन्वयक व इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना 'काळजी करु नकोस, सर्व रुग्ण बरे होतील', अशा शब्दात ट्विट करत दिलासा दिला.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत 25 जानेवारी 2019 रोजी सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे व्यवस्थापन इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर व त्यांचे सहकारी करतात. शहरासह जिल्ह्यातील बेघरांना सावली देण्याचे काम या केंद्रातून होते. दीनदयाळ अंतोदय योजनेतून केंद्र सरकारकडून निवारा केंद्राला निधी उपलब्ध होतो. शिवाय समाजातील दानशूर लोकही या बेघरांच्या मदतीला धावून येत असतात.

 

गेल्या दीड वर्षात अनेकांनी आपले वाढदिवस या निवारा केंद्रातील बेघरांसोबत साजरे केले आहेत. दिवाळी, रमजान, गणेशोत्सव अशा अनेक मोठ्या सणावेळीही लोक बेघरांना मदतीचा हात देत असतात. या केंद्रात ५७ बेघर व ८ कर्मचारी आहेत.राहतात. लॉकडाऊनमुळे बेघरांची संख्या वाढली होती. केंद्रातील एकाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर सावली केंद्रातील ५७ बेघर व कर्मचाऱ्यांचे हे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या ५७ पैकी ४७ बेघर व ४ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सावली केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजताच महापालिकेची यंत्रणा हादरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करत इन्साफ फाउंडेशनचे संचालक मुस्तफा मुजावर यांना दिलासा दिला.

जयंत पाटील यांचे ट्विट

इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर हे सावली बेघर निवारा केंद्रात अनाथ, बेघर लोकांना निवारा देत त्यांची काळजी घेतात. आज या केंद्रावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. मात्र मुस्तफा यांची सेवा अखंड सुरू आहे. मुस्तफा, काळजी करू नका. येथील सर्व रुग्ण लवकरच बरे होतील!

Web Title: Mustafa, don't worry, all the coronaries will be healed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.