शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर खुनी हल्ला, ताकारी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 12:46 IST

‘तू आमच्या खोट्या बातम्या पोलिसांना देऊन आम्हाला अडकवतोस, त्यामुळे तुला आता सोडत नाही’ असे म्हणत मारहाण

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथे ‘तू आमच्या खोट्या बातम्या पोलिसांना देऊन आम्हाला अडकवतोस, थांब तुला आता ठारच मारून टाकतो’ म्हणून पाचजणांच्या टोळक्याने संदीप वीरसिंग जाधव या युवकाला चाकूने भोसकून आणि लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवार, दि. २३ रोजी दुपारी घडला. यातील गंभीर जखमी युवकावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा युवक पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचे समजते.याबाबत जखमी संदीप याची आई सुवर्णा वीरसिंग जाधव (रा. तुपारी, गोसावी वसाहत, ता. पलूस) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रांत बापू क्षीरसागर, प्रतीक जगन्नाथ क्षीरसागर, आशिष उत्तम क्षीरसागर, अक्षय जगन्नाथ क्षीरसागर आणि बंड्या (सर्व रा. ताकारी) या हल्लेखोरांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.संदीप जाधव हा शुक्रवारी ताकारी येथे आला होता. यावेळी कालव्याच्या परिसरात या हल्लेखोरांनी त्याला गाठून ‘तू आमच्या खोट्या बातम्या पोलिसांना देऊन आम्हाला अडकवतोस, त्यामुळे तुला आता सोडत नाही’ असे म्हणत त्याला मारहाण सुरू केली. विक्रांत याने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढत त्याच्यावर वार केले. याचवेळी इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच विटा विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, इस्लामपूरचे निरीक्षक चव्हाण आणि सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. यातील संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस