शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बेळंकीत मूकबधिर तरुणाचा निर्घृण खून, खुनाचे कारण अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:59 IST

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल, श्वान पथक घुटमळले

मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे जानराववाडी रस्त्यावर उमेश पांडुरंग कांबळे (वय ४०) या मूकबधिर व मतिमंद तरुणाचा दगडावर डोके आपटून खून करण्यात आला. खुनाच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.बेळंकी ते जानराववाडी रस्त्यावर रेल्वे पुलानजीक रविवारी सकाळी उमेश कांबळे या मूकबधिर व मतिमंद तरुणाचा मृतदेह रस्त्याकडेला पडल्याचे दिसून आले. शेजारी पडलेल्या दगडावर रक्त लागल्याचे निदर्शनास आले. उमेश याच्या डोक्याला मोठी जखम झाली असून, त्यास ढकलून दगडावर डोके आपटून किंवा दगड डोक्यात घालून खून केल्याचा संशय आहे. मूकबधिर व मतिमंद उमेश कांबळे याच्या खुनामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. रविवारी मध्यरात्री ही खुनाची घटना घडल्याचा संशय आहे.

गावात फिरणारा उमेश शनिवारी रात्री घरी परतला नव्हता. रविवारी सकाळी त्याच्या खुनाची बातमी गावात पसरली. उमेश याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची चर्चा सुरू झाल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बेळंकीचे पोलिस पाटील चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उमेश याच्या खुनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. मूकबधिर आणि मतिमंद उमेशच्या खुनामागे काय कारण असू शकते? याबाबत चर्चा सुरू आहे.श्वान पथक घुटमळलेआरोपीच्या शोधासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथक घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळले. त्यामुळे पुढील माग काढता आला नाही. उमेश कांबळे याच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत तपास सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस