जत: जत शहरापासून सुमारे चार किलोमीटर असणाऱ्या एका पेट्रोल पंपाजवळ ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अमृतवाडी गावच्या हद्दीत एका शेतात हा मृतदेह आढळून आला. ही घटना आज, सोमवारी दुपारी उघडकीस आली. महिलेचा गळा दाबून, डोके दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती अशी की, जत उमदी रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत निर्जन ठिकाणी ज्योतिबा कोरे यांच्या शेतात एका महिलेचा मृतदेह काही शेतकऱ्यांना दिसून आला. त्यांनी जत पोलिसांना याची माहिती देताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. गळा दाबून आणि डोके दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू मृतदेह सडण्यास सुरुवात झाली असल्याने हा खून दोन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज बांधण्यात आला आहे. याशिवाय घटनास्थळी अन्नाचे पदार्थ, स्प्राईटची बाटली आणि बॅग मिळून आली आहे. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली तसेच तपासासाठी नमुनेही घेतले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे व मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
Web Summary : An unidentified woman, aged 30-35, was found murdered near Jat. Her body was discovered in a field with signs of strangulation and head trauma. Police are investigating, working to identify the victim and the circumstances surrounding her death. Forensic experts are assisting in the investigation.
Web Summary : जत के पास एक खेत में 30-35 वर्षीय अज्ञात महिला का शव मिला। गला घोंटने और सिर पर पत्थर से वार करने के निशान हैं। पुलिस जांच कर रही है, पीड़िता की पहचान करने और मौत के कारणों का पता लगाने का प्रयास जारी है। फॉरेंसिक विशेषज्ञ जांच में सहायता कर रहे हैं।