शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सांगलीत रक्तरंजित राजकारण! उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:07 PM

BJP Shiv sena Clashes in Grampanchayat Election, Shivsena Worker Murder in Sangli ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमनताई पाटील गटाचे आहेत

ठळक मुद्दे सांगली जिल्ह्यात बोरगावमध्ये उपसरपंच निवडीवेळी खून भाजप-राष्ट्रवादीच्या गटात तुबंळ हाणामारी; ७ कार्यकर्ते जखमी

सांगली : सांगलीत आज रक्तरंजित राजकारण घडले आहे. उपसरपंच निवडणुकीत भाजपमधून फुटून राष्ट्र्वादीत गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याची भाजप कार्यकर्यांकडून काठ्यांनी मारहाण करून हत्या केली.  उपसरपंच निवडीवरुन बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जनार्दन काळे (वय ५७) या  राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला. गुरुवारी दुपारी (दि. ४) दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडली. भाजप व राष्ट्रवादीच्या गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.

या मारामारीत गणेश पाटील हे ग्रामपंचायत सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.  शिवाय आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. 

 नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्‍त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी (दि. ४) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान, ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमनताई पाटील गटाचे आहेत. यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणणिती आमदार सुमनताई पाटील गटाने आखली होती. उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले.काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. पांडूरंग काळे भाजपच्याच घोरपडे गटाचे होते,  पण ते निवडणुकीत फुटून राष्ट्रवादीत गेले. दरम्यान या घटनेमुळे तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा