महापालिका ठेकेदार काळ्या यादीत?
By Admin | Updated: January 28, 2015 00:54 IST2015-01-27T23:38:46+5:302015-01-28T00:54:56+5:30
उद्या निर्णय : पे अॅण्ड पार्कसाठी फेरनिविदा

महापालिका ठेकेदार काळ्या यादीत?
सांगली : महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय निधीतील कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा विषय गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर चर्चेला आला आहे. या ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही तो काम करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने, प्रशासनाने त्याच्यावर कारवाईची शिफारस केली आहे.
पालिकेच्या स्थायी समितीची सभा येत्या गुरुवारी होत आहे. या सभेत बांधकाम व मागासवर्गीय निधीतील १९ कामे निविदाधारक शाम कुकरेजा यांना देण्यात आली होती. त्यांनी सर्वात कमी दराची निविदा भरली होती. पण गेल्या वर्षभरापासून नगरसेवक, अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करूनही या ठेकेदाराने काम करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कुकरेजा यांना काळ्या यादीत समाविष्ट करून दुसऱ्या क्रमांकाच्या निविदाधारकांकडून ही कामे पूर्ण करून घेण्याचा विषय विषयपत्रिकेवर घेतला आहे. सभेत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त अनुदानातून कचरा उठाव प्रभावशाली होण्यासाठी प्रकल्प राबविला जात आहे. याला १५ लाख रुपये देण्याचा विषयही अवलोकनी घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)