शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:43 IST

मिरजेत गुप्त बैठक, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा, राजकीय हालचालींचा रंगमंच तापला

शीतल पाटील सांगली : महापालिका निवडणुकीचे पडघम अजून औपचारिकरित्या वाजले नसले तरी राजकीय हालचालींचा रंगमंच तापला आहे. काँग्रेसच्या गोटातून बडे नेते भाजपच्या दिशेने झेपावत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सावरून संघटनेला बळ देण्यासाठी खासदार विशाल पाटील व आमदार डाॅ. विश्वजित कदम यांनी मैदानात उडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच दोन्ही नेत्यांनी मिरजेत घेतलेली गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरे देण्याची रणनिती सुरूच आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिका क्षेत्रातील राजकीय गणिते बदलली आहेत. बडे नेते भाजपच्या गळाला लागत असताना काँग्रेसची नाव पैलतिरी लावण्याची जबाबदारी आमदार डाॅ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. दोन्ही नेते मैदानात उतरले असून, पक्षाला बळ देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला आहे.काही दिवसांपूर्वी कदम - पाटील या दोन्ही नेत्यांनी मिरजेत बैठक घेतली. या बैठकीला मिरज अध्यक्ष संजय मेंढे, माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह मोजकीच नेतेमंडळी उपस्थित होती. बैठकीत मिरजेतील राजकीय समीकरणावर चर्चा झाली. राष्ट्रवादी व भाजपशी संबंधित काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये आणण्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिरजेतील राजकीय व जातनिहाय समीकरणावर भाजप व महायुतीसमोर तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपमध्ये प्रवेश न करता काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी नगरसेवकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मिरज शहरात सात प्रभाग आणि २७ नगरसेवक आहेत. सर्व सातही प्रभागात भाजप व काँग्रेसमधील संभाव्य उमेदवार, निवडून येण्यासाठी आवश्यक रसद यावर बैठकीत झाली आहे. भाजप महायुतीला मिरजेतून आव्हान उभे करण्याचा निर्धारही करण्यात आला. त्यामुळे मिरज शहरातील सात प्रभागातील लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे.

नाराजांवर लक्षकाँग्रेस - राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारीवरून रस्सीखेच होणार आहे. भाजपमधील जुने व बाहेरून आलेल्या नव्या कार्यकर्त्यांतील संघर्षात काँग्रेसने नाराजांना गळाला लावण्याची तयारी चालविली आहे. काही माजी नगरसेवकांच्या नावांवरही बैठकीत चर्चा झाली. त्यांना पक्षात घेऊन संघटना बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे.