शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

सांगली जिल्ह्यात विस्तारतेय दुर्मिळ रक्तदात्यांची चळवळ...--रक्तदाता दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:12 AM

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची ...

ठळक मुद्देजागृतीचा परिणाम : संख्या पन्नास हजारांवर;जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून गरजूंसाठी रक्तदाते सरसावत असल्याचे चित्र

अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.

राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्याही वाढताना दिसते. मागणीच्या तुलनेत आजही शंभर टक्के ऐच्छिक रक्तदान होत नसले तरी, भविष्यात हा आकडा गाठणे कठीण नसल्याचेही आशादायी चित्र दिसून येते. साधारण रक्तदानाच्या चळवळीसोबतच दुर्मिळ रक्तगटासाठी विशेष मोहिमा राबविणाऱ्या संघटनांचा जन्म गेल्या काही वर्षांत झाला. यामध्ये आयुष ब्लड हेल्पलाईन, बॉम्बे ओ ग्रुप यासारख्या आणखी काही संघटनांचा समावेश आहे. आयुष या संस्थेकडे ९५०० दात्यांचा मोठा गट आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ३५०० रुग्णांना निगेटिव्ह रक्ताचा, दीड हजार रुग्णांना प्लेटलेटस्चा आणि १७५ रुग्णांना एसडीपी (सिंगल डोनर प्लेटलेटस्)चा पुरवठा केला आहे. त्यांची चळवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यांपर्यंत वाढली आहे.

बॉम्बे ओ या दुर्मिळ रक्तगटाचे जिल्ह्यात केवळ चौघेच आहेत. या चारही लोकांनी अनेकजणांना जीवदान दिले आहे. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३० धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा, ओडिशा व अन्य राज्यात जेथे या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे. या दोन्ही संघटनांसह आजही जिल्ह्यात अनेक संस्था, संघटना रक्तदात्यांची ही चळवळ बळकट करण्याचे काम तितक्याच जोमाने आणि आत्मियतेने करताना दिसत आहेत.शासनाच्या उदासीनतेचा फटका!आयुष संस्थेचे प्रमुख अमोल पाटील म्हणाले की, रक्तदात्यांचे प्रमाण वाढत असतानाच शासनाच्या उदासीनतेचा फटका या चळवळीला बसताना दिसत आहे. आजही रक्तदात्यांकडून मोफत मिळणारे रक्त त्यावरील प्रक्रिया, महागड्या बॅग्ज यामुळे रुग्णापर्यंत जाईपर्यंत महागडे होते. एसडीपीचा केलेला पुरवठा रुग्णापर्यंत जाईपर्यंत ११ ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत महागडा होतो. याचे कारण म्हणजे रक्तावरील प्रक्रिया आणि विशेषत: त्यासाठी वापरल्या जाणाºया बॅग्जच्या किमती. होल ब्लड, प्लेटलेटस्, क्रायो, एफएफपी यासारखे रक्तघटकसुद्धा अशाच प्रक्रियेतून जातात. शासनाने चळवळीचाच एक भाग म्हणून जर यासाठी अनुदान दिले तर, अत्यंत कमी किमतीत हे रक्त गरीब रुग्णांपर्यंत पोहोचविता येऊ शकेल.तुटवड्याचा काळ संपणार कधी?राज्याच्या ऐच्छिक रक्तदात्यांचा आलेख पाहिला तर, १९९६ मध्ये ३८ टक्के इतके प्रमाण होते. २०१६ पर्यंत रक्तदात्यांचा मागणीच्या तुलनेतील पुरवठा ९७.०६ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील काही रक्तपेढी चालकांशी केलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात हेच प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या घरात असेल. रक्ताचा सर्वात मोठा तुटवडा मार्च ते जून या महिन्यांमध्ये जाणवतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षा व सुटीचा कालावधी असल्याने या कालावधित रक्तपुरवठ्याचे प्रमाण घटते. संघटनात्मक पातळीवर आता या कालावधित शिबिर घेणे गरजेचे आहे. 

रक्त व रक्तघटकांचे संक्रमण हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तदानाची ही चळवळ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. रक्तदान केल्याने रुग्णांबरोबरच दात्याच्या आरोग्यालाही तितकेच फायदे मिळत असतात. सांगली जिल्ह्यात ही चळवळ वाढताना दिसत आहे.- डॉ. प्रणिता गायकवाडरक्त संक्रमण अधिकारी, शासकीय रुग्णालय, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक