सुरेंद्र शिराळकरआष्टा : राजकारण आणि नशीब सर्वांनाच लाभते असे नाही नगरपालिकेच्या इतिहासात वडील, मुलगा, सून, सासू यांना एकाच नगरपालिकेत संधी मिळाल्याची उदाहरणे आहेत, मात्र एका नगरपालिकेत आईला तर दुसऱ्या नगरपालिकेत लेकीला प्रभाग क्रमांक पाच मधूनच विजय मिळाला. या अनोख्या राज योगायोगाची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध प्रगतिशील शेतकरी आहेत, त्यांनी माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने दोन वेळा निवडणूक लढवली. नगरसेवक, उपनगराध्यक्ष झाले त्यानंतर त्यांच्या पत्नी मंगल सिद्ध यांना गत वेळी संधी मिळाली. २०२५ च्या आष्टा नगरपरिषद निवडणुकीत मंगल सिद्ध यांना प्रभाग क्रमांक पाचमधून आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने पुन्हा संधी मिळाली आणि त्या विजयी झाल्या बाबासाहेब सिद्ध व मंगल सिद्ध यांच्या कन्या सविता बबन पुजारी यांचे सासर शिरोळ आहे.शिरोळमध्ये शिव-शाहू आघाडीचे प्रमुख गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी व पृथ्वीराजसिंह यादव यांनी सविता पुजारी यांना प्रभाग क्रमांक पाच मधून संधी दिली आणि त्यांनी विजय मिळविला. एकाच वेळी आई व मुलगी चा दोन नगर परिषदेमध्ये विजयी झाल्याने सिद्ध व पुजारी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.हा अनोखा योगायोगबाबासाहेब सिद्ध म्हणाले, आष्ट्यात शहर विकास आघाडीतून मला व आमच्या पत्नीला संधी दिली. काशिलिंग बिरोबा व जनतेच्या आशीर्वादाने माझी पत्नी मंगलसिद्ध व कन्या सविता पुजारी प्रभाग क्रमांक पाचमधून विजयी झाल्या हा अनोखा योगायोग घडून आला. राजकारणातील कोणतेही यश हे जनतेच्या पाठबळावर असते. त्यामुळे हा योगायोग साधण्यातही तेच कारणीभूत आहेत.
Web Summary : In a rare coincidence, a mother and daughter won local body elections from Ward 5 in Ashta and Shirol. The Siddh and Pujari families are celebrating the unique achievement, attributing their success to public support and blessings.
Web Summary : एक दुर्लभ संयोग में, एक माँ और बेटी ने आष्टा और शिरोल में वार्ड 5 से स्थानीय निकाय चुनाव जीते। सिद्ध और पुजारी परिवार इस अनूठी उपलब्धि का जश्न मना रहे हैं, और अपनी सफलता का श्रेय जनता के समर्थन और आशीर्वाद को दे रहे हैं।