शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहापेक्षा नोंदणीचा त्रास अधिक

By admin | Updated: August 10, 2015 00:58 IST

नवविवाहितांची दमछाक : कागदपत्रांची सक्ती

सहदेव खोत- पुनवत -एकवेळ विवाह ठरविणे व विवाह करणे सोपे जाईल, परंतु सध्या विवाह नोंदणी करणे मात्र नागरिकांना फारच त्रासदायक ठरत आहे. विवाहानंतर विवाहाच्या नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे, छायाचित्रे यांची जुळणी करताना नवविवाहित जोडप्यांची पुरती दमछाक होत आहे. मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. विवाह नोंदणीची प्रक्रिया शासनाने एवढी अवघड का केली आहे? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.सध्याच्या काळात वर्षाच्या बारा महिन्यांपैकी बहुतांशी महिन्यात विवाह होतच असतात. लोक सध्याच्या महागाईचा विचार करुन विवाहकार्य मोठा डामडौल न करता झटपट उरकून घेतात. सर्वसामान्य लोक तर ‘यादी पे शादी’ पद्धतीने विवाह उरकून घेत असल्याचे चित्र आहे.विवाहानंतर वर पक्षाकडील लोक आपापल्या भागातील ग्रामपंचायती, नगरपरिषद, महापालिका आदी ठिकाणी विवाहनोंदणी करतात, परंतु अलीकडच्या काळात विवाह नोंदणीच एवढी अवघड झालेली आहे की, नवविवाहित जोडप्यांना विवाह करताना जेवढा त्रास झालेला नसेल, तेवढा त्रास नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या जुळणीसाठी होत आहे. सध्या नोंदणीसाठी वधू-वरांचा शाळा सोडलेला दाखला, त्यांचे रेशन कार्ड झेरॉक्स, फोटो, लग्नपत्रिका, तीन साक्षीदारांचे फोटो व त्यांच्या रेशन कार्डची झेरॉक्स, पुरोहित किंवा भटजीचा दाखला व त्यांचे रेशन कार्ड झेरॉक्स अशी कागदपत्रे लागतात. ही सर्व कागदपत्रे व छायाचित्रांची व्यवस्था करताना वर पक्षाकडील मंडळींची दमछाक होत आहे. या प्रक्रियेत त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.यापूर्वीच्या काळात विवाह नोंदणी सहजरित्या करता येत होती. परंतु या प्रक्रियेसाठी शासनाने भरमसाठ कागदपत्रे व छायाचित्र सक्तीचे केल्याने सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने विवाह नोंदणीसाठी पूर्वीसारखीच पद्धत अंमलात आणावी, अशी मागणी होत आहे.