तासगाव तहसील कार्यालयावर शेकापचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 18:59 IST2021-12-08T18:58:23+5:302021-12-08T18:59:28+5:30
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महावितरण कंपनी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला

तासगाव तहसील कार्यालयावर शेकापचा मोर्चा
तासगाव : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महावितरण कंपनी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन देण्यात आले.
शेती पंपाची वीज तोडणी त्वरित थांबवण्यात यावी, वाढीव वीज बिले रद्द करत तोडलेली कृषिपंपाची वीज त्वरित जोडावीत, थकबाकीदार कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचा मोहीम महावितरण कार्यालयाने तत्काळ थांबवून सवलत द्यावी, अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, विनोद लगारे, कवठे एकंदचे सरपंच अशोक शिरोटे, शेकापचे नेते बाबूराव जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.