आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर मोकाट कुत्र्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 16:59 IST2021-07-06T16:54:32+5:302021-07-06T16:59:59+5:30

Dog Bite Sangli : सांगलीतील संजयनगर येथे महापालिका आरोग्य विभागात डॉग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी परशुराम वसंत कांबळे ( वय ३३) यांच्यावर मंगळवारी मोकाट कुत्र्याने हल्ला केला. कांबळे यांना उपचारासाठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली आहे.

Mokat dog attack on health department staff | आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर मोकाट कुत्र्याचा हल्ला

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर मोकाट कुत्र्याचा हल्ला

ठळक मुद्देआरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर मोकाट कुत्र्याचा हल्लाउपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल, उजव्या पायाला जखम

संजयनगर/सांगली : सांगलीतील संजयनगर येथे महापालिका आरोग्य विभागात डॉग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी परशुराम वसंत कांबळे ( वय ३३) यांच्यावर मंगळवारी मोकाट कुत्र्याने हल्ला केला. कांबळे यांना उपचारासाठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली आहे.

सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. यापूर्वीही कुत्र्याने हल्ले केले आहेत. दोन दिवसापूर्वी येथील आराध्या प्रदीप दुपटे (वय ९) या मुलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला केला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्री पकडण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
 

Web Title: Mokat dog attack on health department staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.