माॅडेल स्कूलमुळे सिध्देवाडी शाळेच्या वैभवात भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:46+5:302021-07-15T04:19:46+5:30

ओळ : सिध्देवाडी (ता. मिरज) येथे शाळा भेटीत नूतन सभापती गीतांजली कणसे यांचा सत्कार उपसरपंच इंदाबाई शिनगारे यांनी केला. ...

Model School adds to the splendor of Siddhewadi School! | माॅडेल स्कूलमुळे सिध्देवाडी शाळेच्या वैभवात भर !

माॅडेल स्कूलमुळे सिध्देवाडी शाळेच्या वैभवात भर !

ओळ :

सिध्देवाडी (ता. मिरज) येथे शाळा भेटीत नूतन सभापती गीतांजली कणसे यांचा सत्कार उपसरपंच इंदाबाई शिनगारे यांनी केला. यावेळी उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, सरपंच रामचंद्र वाघमोडे उपस्थित हाेते.

मालगाव : माॅडेल स्कूलअंतर्गत निवड झाल्याने सिध्देवाडी (ता. वाळवा) येथील प्राथमिक शाळेच्या वैभवात भर पडेल, मंजूर निधीतून दर्जेदार कामे करून घ्यावीत, अशी सूचना सभापती गीतांजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी केली.

सभापती गीतांंजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी निवड झालेल्या शाळांना भेट दिली. मालगावबरोबरच त्यांनी सिध्देवाडी शाळेस भेट देऊन कामांसंदर्भात सरपंच रामचंद्र वाघमोडे, मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांच्याशी चर्चा केली. मुख्याध्यापक ओमासे यांनी शाळेसाठी आवश्यक बाबी मांडल्या. सभापती निवडीबद्दल गीतांजली कणसे यांचा सत्कार केला.

शाळाखोल्या बांधकामासह इतर कामांसाठी ४५ लाखाचा निधी मंजूर आहे. कामे दर्जेदार करा, अशी सूचना गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी यावेळी केली. माॅडेल स्कूलच्या माध्यमातून आलेल्या निधीतून शाळांचे रूप बदलणार आहेच, त्याबरोबर सोयी-सुविधांमुळे तालुक्यातील प्राथमिक शाळा स्पर्धात्मक बनतील, असा विश्वास सभापती गीतांजली कणसे व उपसभापती अनिल आमटवणे यांनी व्यक्त केला.

यावेळी सहायक गटविकास अधिकारी अशोक बांगर, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे, विस्तार अधिकारी एस. टी. मगदूम, शाखा अभियंता कुलकर्णी, उपसरपंच इंदाबाई शिनगारे, महावीर खोत, सदस्य अशोक गरंडे, स्नेहलता होवाळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Model School adds to the splendor of Siddhewadi School!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.