कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 17:47 IST2021-02-15T17:45:39+5:302021-02-15T17:47:10+5:30

Corona vaccine Sangli- कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारिरीक आंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर प्रभावीपणे करत रहाणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कोणही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

Mobile Chitrarath will be effective for covid vaccination and self-reliant India awareness | कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी

कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी

ठळक मुद्देकोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी ठरेल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली  : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारिरीक आंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर प्रभावीपणे करत रहाणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कोणही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक रणजित पवार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लसीकरणाबाबत पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे पारंपारिक कला जोपासणाऱ्या कलाकारांना व त्यांच्या कलागुणांना समाजासमोर सादर करण्यासाठी या मोबाईल चित्ररथामुळे संधी मिळेल.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 16 व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसीकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये 10 दिवस व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकारकरीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे, एन. डी. नाळे, विलास शेणवी, कलापथकाचे शिवा संभा कलापथकाचे अवधुत पवार व त्यांच्या चमुचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

Web Title: Mobile Chitrarath will be effective for covid vaccination and self-reliant India awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.