शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव, आमदार सुहास बाबर यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:44 IST

राहुल नार्वेकर यांचे कारवाईचे निर्देश

विटा : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असताना कसलीही कल्पना न देता परस्पर आटपाडी तालुक्यातील तीन वीज उपकेंद्राचे उद्घाटन केल्याप्रकरणी आमदार सुहास बाबर यांनी ‘महावितरण’च्या होल्डिंग कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांच्यासह महावितरणच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात मंगळवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव सादर केला. यावेळी ही बाब अत्यंत गंभीर असून याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या तक्रार दाखल केली. दि. १४ मार्चला खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडी तालुक्यात महावितरणच्या हिवतड, शेटफळे व दिघंची या तीन उपकेंद्रांचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला होता. सदर तिन्ही प्रकल्प हे पूर्णतः माझ्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतात. यासंदर्भात शासननिर्णयानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण, अध्यक्षपद व नियोजन माझ्याशी सल्लामसलत करून होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मला कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच कार्यक्रमासाठी निमंत्रित न करता परस्पर दुसऱ्या मतदारसंघाच्या आमदारांना पाचारण करून त्यांच्याहस्ते उद्घाटन पार पाडले आहे.

ही बाब अत्यंत गंभीर असून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र विधानसभा नियमावलीतील नियम २७३ अन्वये महावितरण होल्डिंग कंपनीच्या संचालिका नीता केळकर, विटा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते, आटपाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश डावरे, करगणी शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता द्वारकेश बाबर व दिघंचीचे सहाय्यक अभियंता महेबूब हुबाले यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करावी, अशी मागणी करत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांवर विधिमंडळ अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेक लोकप्रतिनिधींच्या अशा बऱ्याच तक्रारी आहेत परंतु अशा तक्रारी येणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. संबंधित हक्कभंगाबाबत माहिती सादर करावी व संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

सदस्यांच्या अधिकार रक्षणाची जबाबदारी सभागृहाचीमहाराष्ट्र विधानसभा नियम २७३ नुसार या सभागृहातील सदस्यांचे अधिकार, सन्मान आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करण्याची जबाबदारी या सभागृहावरती असते. मात्र, माझ्या मतदारसंघात घडलेल्या या घटनेमुळे माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या अधिकाराचा स्पष्टपणे भंग झाल्याची प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी यावेळी दिली.

महावितरण कंपनीकडून आटपाडी तालुक्यातील या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मला जाणीवपूर्वक त्या भागाचा आमदार असताना त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. - आमदार सुहास बाबर, विटा

English
हिंदी सारांश
Web Title : Privilege motion against BJP leader, four officials for power plant inauguration.

Web Summary : MLA Suhas Babar files privilege motion against officials, including BJP's Nita Kelkar, for inaugurating power sub-centers without informing him. Speaker orders action.