शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Sangli Politics: इस्लामपुरात नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील भरून काढणार, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:05 IST

अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे तरीही सत्ताधारी आणि विरोधी गटात शहरात खमके नेतृत्वच ...

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे तरीही सत्ताधारी आणि विरोधी गटात शहरात खमके नेतृत्वच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेही शहरात सक्षम नेतृत्वच नाही. नगरपालिका निवडणुकीपूर्वी जयंत पाटील शहरातील नेतृत्वाची पोकळी भरून काढतील, अशी अपेक्षा आहे. अंतर्गत मतभेद असल्याने शहरातील नेतृत्व निवडणे आव्हानात्मक आहे. त्यामुळेच राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील आलबेल असल्याचे दाखवत आहेत परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पडझड त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूर मतदारसंघात उभी केलेली विरोधी ताकद आव्हानात्मक आहे. त्यामुळेच आगामी नगरपालिका निवडणुकीत इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांच्या अपरोक्ष खमके नेतृत्व उभे करण्यासाठी आतापासूनच बांधणी केली पाहिजे. परंतु त्यांच्याच समर्थकांत अंतर्गत वेगवेगळे गट असल्याने शहराच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी पालिका निवडणुकीची सूत्रे प्रतीक पाटील यांच्याकडे द्यावी, अशीही कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे.जयंत पाटील यांना इस्लामपूर शहरात संपर्क साधताना ॲड. चिमण डांगे, शहाजी पाटील आणि खंडेराव जाधव यांना घेऊनच जनतेशी संपर्क साधावा लागतो. शहराच्या नेतृत्वाबद्दल काहीच निर्णय होत नाहीत. त्यामुळेच आगामी इच्छुक उमेदवार शोधण्यासाठी जयंत पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. प्रभागनुसार बूथ सक्षम करण्यासाठी पुन्हा मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. नवीन इच्छुक उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे. आगामी नगरपालिका निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी गटासाठी सोप्या नाहीत म्हणून जयंत पाटील यांनी प्रभाग समित्या सक्षम करण्यापासून राबावे लागणार आहे. अन्यथा ऐनवेळी होणाऱ्या विरोधी विकास आघाडीला शह देणे जयंत पाटील यांना आव्हान असणार आहे, अशीही चर्चा इस्लामपूर शहरात आहे.

दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्यानंतर शहराला सक्षम नेतृत्व मिळाले नाही. त्यानंतर जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नेतृत्व उदयास आले आहे. त्याप्रमाणेच सध्या शहरातील राजकीय वाटचाल सुरू आहे. आमच्याकडे सक्षम नेते आणि कार्यकर्त्यांची फळी आहे. या जोरावरच आगामी निवडणुका आम्ही जिंकणार आहे. -शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस