शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 09:25 IST

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

Jayant Patil ( Marathi News ) :  स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जानेवारी महिन्यात झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळासमवेत सहभागी झाले होते. मात्र आता या दौऱ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी तिथल्या एका कंपनीने सरकारला १.५८ कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.या बिलावरुन आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 'शिवस्वराज्य यात्रा'सुरू आहे. ही यात्रा काल रविवारी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे पोहोचली. यावेळी सभेत बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

"काल मी एक बातमी वाचली की, राज्याचे मुख्यमंत्री उद्योग आणण्यासाठी दावोसला गेले होते. दावोस स्विझर्लंडमध्ये आहे, तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन आमचा महाराष्ट्र कसा चांगला आहे हे सांगितलं असेल. ठाण्यात गेलं की मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोणता हॉटेलवाला बिल मागत नाही, मागायचही नाही आणि द्यायचंही नाही तशी सवयच नाही. हे तिकडे गेले आणि त्याच स्टाईलने परत आले, आता त्यांना दावोसमधील हॉटेलवाल्यांनी बिल पाठवलं आहे. आमचं बिल आम्हाला पाठवा, यांनी तिथे बिलच दिलेले नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

 "महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी हे सरकार पूर्ण अपयशी आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे त्याचं प्रायश्चित भाजपाला देण्याचा योग उद्याच्या विधानसभा निवडणुकीत आहे. तो योग तुम्ही साधायचा आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.  

राज्य सरकारला दावोसमधून नोटीस

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील मंत्री आणि काही अधिकारी जानेवारी महिन्यात स्वित्झर्लंडमधील दावोस जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. मात्र आता या दौऱ्यातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या राहण्या-खाण्याचे बिलाची रक्कम देणे बाकी असल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्र सरकारला स्वित्झर्लंडस्थित सेवा क्षेत्रातील कंपनीकडून १.५८ कोटी रुपयांची बिले न भरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या कंपनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था पाहण्याचे काम केले होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना