मिरज, इस्लामपुरातील दोन टोळ्या तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 20:59 IST2019-09-24T20:56:25+5:302019-09-24T20:59:01+5:30

२०१६ ते २०१८ या कालावधित मोटारसायकल चोरी, नागरिकांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणे, गर्दी जमवून मारहाण, धमकी, शिवीगाळ असे गंभीर स्वरुपाचे ८ गुन्हे दाखल आहेत.

Miraj, two gangs in Islamapur | मिरज, इस्लामपुरातील दोन टोळ्या तडीपार

मिरज, इस्लामपुरातील दोन टोळ्या तडीपार

ठळक मुद्देआठजणांचा समावेश : पोलीस अधीक्षकांची कारवाई

सांगली : मिरज व इस्लामपूर येथील दोन टोळ्यांना सांगली जिल्'ातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मंगळवारी या टोळ्यांवर तडिपारीची कारवाई केली. मिरजेतील अजय माने व त्याच्या दोन साथीदारांना सांगली, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्'ांतून, तर इस्लामपुरातील प्रकाश पुजारी व त्याच्या चार साथीदारांना सांगली व सातारा या दोन जिल्'ातून हद्दपार करण्यात आल्ो. या टोळीविरुद्ध गर्दी, मारामारी, चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजय अशोक माने, (वय २२, रा. इंदिरानगर, मालगाव रोड, मिरज) याने आपल्या दोन साथीदारांसह टोळी निर्माण केली होती. त्याच्या टोळीत प्रवीण ऊर्फ राहुल सदाशिव जाधव, (२३, रा. तुंग, ता. मिरज), राहुल ऊर्फ अण्णा अर्जुन माने (२७. रा. दत्तनगर मिरज) या दोघांचा समावेश होता. या टोळीविरुध्द मिरज शहर, महात्मा गांधी चौकी, विश्रामबाग, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर, पंढरपूर, चिकोडी पोलीस ठाण्यात २०१६ ते २०१८ या कालावधित मोटारसायकल चोरी, नागरिकांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणे, गर्दी जमवून मारहाण, धमकी, शिवीगाळ असे गंभीर स्वरुपाचे ८ गुन्हे दाखल आहेत. ते न्यायालयातून जामिनावर सुटल्यावर पुन्हा अशाचप्रकारचे गुन्हे करीत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये दहशत व भीती निर्माण झाली आहे.

या टोळीविरुद्ध तडिपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार अधीक्षक शर्मा यांनी अजय माने व त्याच्या दोन साथीदारांना तीन जिल्'ातून तडीपार करण्याचे आदेश दिले.

इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश महादेव पुजारी (वय ३०, रा. एमआयडीसी, इस्लामपूर) यानेही चार साथीदारांसह टोळी निर्माण केली होती. या टोळीत राकेश चलन कुचीवाले (वय २८, रा. माळगल्ली, इस्लामपूर), अनिकेत नरसगोंडा खोत (१९, रा. साखराळे), सुमित ऊर्फ बबलू मारुती हुलेनवार (१९, रा. माळगल्ली, इस्लामपूर), अजित शंकर पाटील (२२, रा. इस्लामपूर) या चौघांचा समावेश होता.

 

Web Title: Miraj, two gangs in Islamapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.