कार्तिकी वारीसाठी मिरज-पंढरपूर जादा रेल्वे गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 08:08 PM2018-11-17T20:08:21+5:302018-11-17T20:08:41+5:30

कार्तिक वारीसाठी मिरज-पंढरपूर, कुर्डुवाडीदरम्यान दि. १८ पर्यंत तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Miraj-Pandharpur additional trains for Kartika Wari | कार्तिकी वारीसाठी मिरज-पंढरपूर जादा रेल्वे गाड्या

कार्तिकी वारीसाठी मिरज-पंढरपूर जादा रेल्वे गाड्या

googlenewsNext

मिरज : कार्तिक वारीसाठी मिरज-पंढरपूर, कुर्डुवाडीदरम्यान दि. १८ पर्यंत तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या १६ फेऱ्या होणार आहेत.

विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळा पुढीलप्रमाणे : मिरज-पंढरपूर : मिरज येथून पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून पंढरपूर येथे सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. हीच गाडी पंढरपूर येथून सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी सुटून मिरज येथे दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी येईल. मिरज-कुर्डुवाडी : मिरज येथून दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटून कुर्डुवाडी येथे यात्री ९ वाजता पोहोचेल. हीच गाडी कुर्डुवाडी येथून रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटून मिरज येथे मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी यईल.

वरील दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी सहा फेºया होणार आहेत. पंढरपूर-मिरज ही विशेष गाडी पंढरपूर येथून सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी सुटून मिरज येथे दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल, तर मिरजेतून दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी सुटून ती पंढरपूरला सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. या विशेष गाडीच्या प्रत्येकी ८ फेºया होणार आहेत. पंढरपूर रेल्वे मार्गावर नियमित धावणाºया रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त ३ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याने पंढरपूर वारीसाठी जाणाºया भाविकांची सोय होणार आहे.

Web Title: Miraj-Pandharpur additional trains for Kartika Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.