शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लातूरकरांचीही तहान भागविणारी मिरजेची हैदरखान विहीर बनली डबके, ऐतिहासिक वास्तू होणार नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:38 IST

२०१६ मध्ये मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत हैदरखान विहिरीत कृष्णा नदीच्या पाण्याचा साठा करून मिरजेतून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला

सदानंद औंधेमिरज : मिरजेतील रेल्वेस्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीतून सात वर्षांपूर्वी  दुष्काळात लातूरकरांचीही तहान भागविण्यात आली होती. मात्र, आता विहिरीचा वापर नसल्याने विहिरीचे डबके झाले आहे. या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी होत आहे. मिरज रेल्वेस्थानकात असलेल्या हैदरखान विहिरीचा ताबा १८८७ मध्ये  रेल्वेकडे आला. त्यानंतर सुमारे सव्वाशे वर्षे रेल्वेचे डबे धुणे, स्थानकाची स्वच्छता व रेल्वे गाड्यात पाणी भरण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर होत होता. रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने दहा वर्षांपूर्वी रेल्वेने मिरज स्थानक व कर्मचारी वसाहतीसाठी कृष्णा नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना  सुरू केली. त्यानंतर या विहिरीचे महत्त्व कमी झाले. २०१६ मध्ये मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत हैदरखान विहिरीत कृष्णा नदीच्या पाण्याचा साठा करून मिरजेतून  रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला. जलपरी एक्स्प्रेसने सलग चार महिने दररोज लाखो लिटर पाणी नेऊन लातूरकरांची तहान भागवली होती.  रेल्वेने पाणीपुरवठ्याच्या राज्यातील पहिल्याच यशस्वी प्रयोगामुळे हैदरखान विहिरीला मोठी प्रसिद्धी मिळाली. लातूरची तहान भागवणारी ही विहीर आता वापरात नाही. विहिरीत परिसरातील लोक कचरा टाकत आहेत. काठावरील  झाडांची पाने पाण्यात पडत आहेत. विहिरीत शेवाळ साचले आहे. विहिरीच्या कठड्यावर झुडपे उगवल्याने कठडे पडण्याच्या स्थितीत आहेत. रेल्वेने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू केल्याने हैदरखान विहिरीतील मुबलक पाण्याचा वापर थांबल्याने विहिरीचे डबके झाले आहे. लातूरला पाणीपुरवठ्यासाठी विहिरीत बसविण्यात आलेल्या मोटारी व जलवाहिन्या काढण्यात आल्या आहेत. या विहिरीची स्वच्छता, देखभालीकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहे. विहिरीचे पुनरुज्जीवन न झाल्यास ती इतिहासजमा होणार आहे.

आदिलशहाच्या सरदाराने बांधली विहीरविहिरीला ऐतिहासिक वारसा आहे. १५८३ मध्ये आदिलशहाचा सरदार हैदरखान याने बांधलेल्या या मोठ्या विहिरीतून त्याकाळी परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत होता. संस्थान काळातही सिंचनासाठी वापर होत असल्याची नोंद आहे. तिचे पाणी मिरज शहरात मीरासाहेब दर्ग्यात दगडी कारंजासाठी नेण्यात आले होते.  त्यासाठी हत्तींची मोट वापरण्यात येत होती. या विहिरीत हत्ती बांधण्यासाठी तयार केलेले दगडी अंकुश आजही सुस्थितीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजlaturलातूरWaterपाणी