शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य: अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडेंविरोधात मिरजेत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 11:33 IST

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांबाबत आक्षेपार्ह, निषेधार्ह व खोटे, गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले.

मिरज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ब्राह्मणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मिरजेत ब्राह्मण समाजातर्फे गांधी चाैक पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांबाबत आक्षेपार्ह, निषेधार्ह व खोटे, गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या दोघांनी हसून मिटकरी यांना प्रोत्साहन दिले.राष्ट्रवादी काँग्रेस जातीचे राजकारण करीत असून प्रदेशाध्यक्षांसमोर ब्राह्मण समाजाबद्दल पक्षाचा आमदार खोटी वक्तव्य करतो. प्रदेशाध्यक्ष व इतर मंडळी त्याची मजा घेतात. याबद्दल संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी ब्राह्मण परिवाराचे अध्यक्ष ओमकार शुक्ल यांनी गांधी चाैक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी किशोर पटवर्धन, विनोद गोरे, सुमेध ठाणेदार, अभय आठवले, ओंकार जोशी, निलेश साठ्ये, जयंत सहस्रबुद्धे यांच्यासह ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीJayant Patilजयंत पाटीलAmol Mitkariअमोल मिटकरीDhananjay Mundeधनंजय मुंडे