मिरजेत एसटी वाहक महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: July 6, 2014 00:02 IST2014-07-06T00:00:15+5:302014-07-06T00:02:40+5:30
कौटुंबिक वाद

मिरजेत एसटी वाहक महिलेची आत्महत्या
मिरज : मिरजेत समतानगर येथे अर्चना भागू नरुटे (वय २४) या एसटीतील महिला वाहकाने गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून अर्चना यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.
कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील अर्चना भागू नरुटे यांची चार वर्षांपूर्वी एसटीत वाहकपदी नियुक्ती झाली होती. अर्चना यांचे वर्षभरापूर्वी संबर्गी येथील मामाचा मुलगा भागू नरुटे याच्याशी लग्न झाले होते. अर्चना यांचा पती बचत गटांना कर्जपुरवठा करणाऱ्या विजयनगर येथील संस्थेत नोकरीस असल्याने दोघे मिरजेत समतानगर येथील संतोष जेडगे यांच्या घरात भाड्याने रहात होते. शुक्रवारी रात्री पती बाहेर गेल्यानंतर घरात एकट्याच असलेल्या अर्चना यांनी गळफास लावून आत्महत्या केली. पती घरी आल्यानंतर अर्चनाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.याबाबत शहर पोलिसात नोंद आहे. (वार्ताहर)