शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे बापाने लग्न लावून दिले, सासरच्यांनी छळले; सांगली जिल्ह्यातील एका नकोशीची फरपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:18 IST

पीडित मुलीने धाडसाने पोलिसांचे दार ठोठावले, गुन्हा दाखल

इस्लामपूर : स्वत:ची मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असतानाही बापाने तिचे चार महिन्यांपूर्वी लग्न लावून दिले. तिचे नशीब फुटके असेल म्हणून तिला एवढ्या लहान वयात सासरच्या मंडळींनी मारहाण आणि शिवीगाळ करत तिचा जाच केला. एवढ्या लहान वयात हे भोग भोगणाऱ्या पीडित मुलीने धाडसाने पोलिसांचे दार ठोठावले. त्यातून तब्बल सहा जणांविरुद्ध बाल विवाह आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वाळवा तालुक्यातील एका गावात ही अघोरी घटना मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात घडली. पीडित मुलीचे आईचे निधन झाले आहे. ही मुलगी इयत्ता आठवीत शिकणारी आहे. वडिलांनी एका मध्यस्थ महिलेच्या पुढाकाराने तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर ११ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत पती, सासू आणि सासऱ्याकडून झालेला जाचहाट असह्य झाल्यावर या कारनाम्याला वाचा फुटली.पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिल्यावर लग्नासाठी मध्यस्थी करणारी भागा मावशी आणि लग्न लावून देणाऱ्या विद्याधर (दोघांची पूर्ण नावे नाहीत) यांच्यासह वडील आणि सासरकडील ६ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या बापाने मागील डिसेंबर महिन्यात लग्न लावून दिले. त्यांनतर या नकळत्या वयातील मुलीच्या नशिबी सासुरवास आला. लग्न करून बाप मोकळा झाला होता, मात्र भोग या मुलीच्या वाट्याला आले. सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करण्यासह शिवीगाळ करत तिचा जाच केला. ही मुलगी ४ महिने हा जाच सहन करत राहिली; पण, शेवटी तिच्या बाळबोध भावनेचा बांध फुटला. त्यावेळी तिने थेट पोलिसात धाव घेत आपल्यावर आलेल्या संकटाची आपबीती सांगितली. त्यावर पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस