शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: अत्याचारातून अल्पवयीन युवती गर्भवती, तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:17 IST

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने संशयित ...

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने संशयित बाहुबली ऊर्फ मानतेश दशरथ डुक्की (रा. वसंतनगर, नांद्रे, ता. मिरज) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती १७ वर्षे तीन महिन्यांची (अल्पवयीन) आहे. ती मिरज तालुक्यातील एका गावात राहते. पीडित युवती आणि बाहुबली या दोघांची ओळख होती. बाहुबली याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून घरासमोरील एका रिकाम्या घरात वारंवार घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी २०२४ पासून हा प्रकार सुरू होता. या प्रकारातून युवती तीन महिन्यांची गर्भवती राहिली. जिवे मारण्याची दिली धमकी तिने हा प्रकार बाहुबली याला सांगितला. तेव्हा बाहुबली याने तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती घाबरली. अखेर तिने घरातील लोकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री फिर्याद दिली. त्यानुसार बाहुबली याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस